Corona Second Wave | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत धारावी नाही, मुंबईत नवा हॉटस्पॉट समोर

| Updated on: Mar 25, 2021 | 3:13 PM

शात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने चिंता वाढली असताना यामध्ये दोन (Andheri West Becoming The New Hotspot Of Corona Virus) राज्यांमधील परिस्थिती जास्त चिंताजनक आहे.

Corona Second Wave | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत धारावी नाही, मुंबईत नवा हॉटस्पॉट समोर
प्रातिनिधिक छायाचित्रं
Follow us on

मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने चिंता वाढली असताना यामध्ये दोन (Andheri West Becoming The New Hotspot Of Corona Virus) राज्यांमधील परिस्थिती जास्त चिंताजनक आहे. यामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून देशात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या 10 जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रात आहेत. यात मुंबईचाही समावेश आहे. मुंबईत कोरोना रुग्ण संख्येचा वेग वाढल्याने धोका वाढला आहे (Andheri West Becoming The New Hotspot Of Corona Virus).

मुंबईत गेल्यावर्षीच्या मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. महापालिका आणि आरोग्य विभागाच्या प्रयत्नांमुळे रुग्ण संख्या कमी होत होती. मात्र, यावर्षी फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मुंबईत सलग तीन दिवस सर्वाधिक तीन हजारावर रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर आज सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. आज मुंबईत तब्बल 5185 रुग्णांची नोंद झाली असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद होत असल्याने मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

अंधेरी पश्चिम भागात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या

त्यातच आणखी एक चितेंची बात पुढे आली आहे. गेल्या वर्षी करोनाचा हॉटस्पोट ठरलेल्या धारावीत तर सध्या परिस्थिती नियंत्रणात आली आहे. मात्र, करोनाच्या दुसऱ्या लाटेत अंधेरी पश्चिम भागात सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून येत आहे. त्यामुळे अंधेरी पश्चिम हा कोरोनाचा नवा हॉटस्पॉट ठरतो आहे.

मुंबईत बोरिवली, अंधेरी, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहे. या विभागात सर्वाधिक कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे या विभागात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे. त्यातही अंधेरी पश्चिम भागात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत.

कोरोनाची दुसरी लाट

गेल्या वर्षी मार्चमध्ये मुंबईत करोनाने शिरकाव केला. त्यानंतर धारावी करोनाचा हॉटस्पोट ठरला होता. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बीएमसीने धारावी पॅटर्न राबवला आणि पालिकेच्या या पॅटर्नमुळे धारावीतील रुग्णसंख्या अटोक्यात आली. मात्र, कोरोनाच्या दुसरी लाट गेल्या वर्षी पेक्षाही जास्त भयानक ठरते आहे. मुंबईत गेल्या 24 तासांच 5185 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, यावेळी झोपडपट्टी आणि चाळचं नाही तर उच्चभ्रू वस्तीतही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याची माहिती आहे.

अंधेरी पश्चिम या भागात करोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. येथे दिवसाला तब्बल 200 ते 300 रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे अंधेरी पश्चिम भाग हा करोनाचा नवा हॉटस्पॉट ठरत आहे (Andheri West Becoming The New Hotspot Of Corona Virus).

अंधेरी पश्चिमभागातील वाढती रुग्णसंख्या पाहता बीएमसी लवकरच जुहू बीच बंद करण्याच्या विचारात आहेत. जुहू बीचवर पालिकेचे क्लिनअप मार्शल तैनात करण्यात आले आहेत. त्याशिवाय, मास्कशिवाय वावरणाऱ्यांकडून दंड आकारला जात आहे. त्यासोबतच अँटिजेन टेस्टची संख्याही वाढवण्यात आली आहे.

राज्यात कोरोनाची परिस्थिती बिकट

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या थांबताना दिसत नाही. राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा शहरांमध्ये मोठ्या संख्येनं रुग्णंसंख्या वाढत आहे. राज्यातील आज 2021 मधील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. आज दिवसभरात 31 हजार 855 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात 15 हजार 98 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दिवसभरात 95 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यात सध्या 2 लाख 47 हजार 299 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील आतापर्यंतचा कोरोना रुग्णांचा आकडा 25 लाख 64 हजार 881वर जाऊन पोहोचला आहे. त्यातील 22 लाख 62 हजार 593 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 53 हजार 684 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

Andheri West Becoming The New Hotspot Of Corona Virus

संबंधित बातम्या :

Nashik Lockdown update : नाशिकची लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल, नियम न पाळणारी दुकानं 6 महिन्यांसाठी बंद

पुण्यातील परिस्थिती नियंत्रणात, तूर्तास लॉकडाऊन नको : महापौर