अनिल कपूरला ‘या’ खेळाडूच्या बायोपिकमध्ये काम करायचयं

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर यांना क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकरच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा आहे. अनिल कपूर यांनी वृत्तसंस्था आयएएनएसला दिलेल्या एका मुलाखतीत ही इच्छा व्यक्त केली. तुम्हाला कुठल्या खेळाडूच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल या प्रश्नावर त्यांनी सचिन तेंडूलकरचे नाव घेतले. सोबतच ते सचिनचे चाहते असल्याचंही त्यांनी सांगितलं. या शुक्रवारी 22 फेब्रुवारीला अनिल […]

अनिल कपूरला ‘या’ खेळाडूच्या बायोपिकमध्ये काम करायचयं
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर यांना क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकरच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा आहे. अनिल कपूर यांनी वृत्तसंस्था आयएएनएसला दिलेल्या एका मुलाखतीत ही इच्छा व्यक्त केली. तुम्हाला कुठल्या खेळाडूच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल या प्रश्नावर त्यांनी सचिन तेंडूलकरचे नाव घेतले. सोबतच ते सचिनचे चाहते असल्याचंही त्यांनी सांगितलं.

या शुक्रवारी 22 फेब्रुवारीला अनिल कपूर यांचा ‘टोटल धमाल’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. हा सिनेमा ‘धमाल’ या सिनेमाचा तिसरा सीक्वल आहे. सिनेमाच्या पहिल्या भागात अभिनेता संजय दत्त, अरशद वारसी, जावेद जाफरी, रीतेश देशमुख यांची प्रमुख भूमिका होती. या सिनेमाचा तिसरा भाग म्हणजेच ‘टोटल धमाल’ हा एक मल्टीस्टारर सिनेमा आहे. या सिनेमात अभिनेता अजय देवगन, बोमन ईराणी, अरशद वारसी, जावेद जाफरी, रीतेश देशमुख आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित, इशा गुप्ता यांची प्रमुख भूमिका आहे.

अनेक वर्षांनी प्रेक्षकांना माधुरी आणि अनिल कपूर एकत्र बघायला मिळणार आहेत. माधुरीसोबत पुन्हा काम करुन कसं वाटलं, असं विचारल्यावर, “माधुरीसोबत काम करणं खूप जबरदस्त होतं. ती सिनेसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे”, असे अनिल कपूर म्हणाले.

VIDEO : 

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.