मोदींच्या नेतृत्वाखाली शिवशाही- रामराज्य…; संविधानावरून टीका करणाऱ्या विरोधकांना नितीन गडकरींचं प्रत्युत्तर

Nitin Gadkari on Solapur Loksabha Election 2024 : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत सोलापूरमध्ये महायुतीची सभा झाली. या सभेत बोलताना नितीन गडकरी यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. सोलापुरात बोलताना नितीन गडकरी काय म्हणाले? वाचा सविस्तर...

मोदींच्या नेतृत्वाखाली शिवशाही- रामराज्य...; संविधानावरून टीका करणाऱ्या विरोधकांना नितीन गडकरींचं प्रत्युत्तर
Follow us
| Updated on: May 05, 2024 | 6:02 PM

सोलापूरमध्ये महायुतीची सभा होतेय. या सभेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संबोधित केलं. या सभेत बोलताना नितीन गडकरी यांनी इंडिया आघाडीच्या टीकेला उत्तर दिलं. भाजप पुन्हा सत्तेत आलं तर ते देशाचं संविधान बदलतील, अशी टीका विरोधक करत असतात. त्याला गडकरींनी प्रत्युत्तर दिलं.मी फक्त बोलणारा लीडर नाही. मी सांगतो ते लिहून घ्या. इथे पत्रकार बसलेत. इथे बसलेल्या कोणीही माझी ब्रेकिंग न्यूज लावून दाखवावी कारण मी जे बोलतो ते करून दाखवतो. देशात कोणीही पक्ष, नेता आणि सरकार कोणीही देशाचे संविधान कोणीही बदलू शकत नाही. मात्र देशाच्या घटनेत दुरुस्ती करता येते. काँग्रेसने 80 वेळा घटना तोडण्याचे पाप केलं, असं म्हणत नितीन गडकरी यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

“स्मार्ट व्हिलेज तयार करायचंय”

मळणी यंत्र ज्याप्रमाणे गावागावात आले त्याप्रमाणे आता गावात ड्रोन येतील. शेतकऱ्यांचा पाणी डिपॉझिट केलं पाहिजे. धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा. चालणाऱ्याला थांबायला लावा. थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. ग्रामीण भागातील 30 टक्के लोकसंख्या कमी झाली. साहेबांची मुलगी काय म्हणते शेतकरी नवरा नको म्हणते. स्मार्ट शहर नव्हे तर स्मार्ट व्हिलेज तयार करायचं आहे, असंही गडकरी म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज आमचे आदर्श- गडकरी

जात, पंथ, भाषा या आधारावर कोणतेही डिस्क्रिमिनेशन आम्हाला मान्य नाही. आमचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आमच्या आई-वडिलांपेक्षाही छत्रपती शिवरायांवर आमचा जास्त विश्वास आहे. शिवरायांनी अनेक लढाया जिंकले मात्र त्यांनी कधीही कोणती मशिद नाही पाडली. शिवाजी महाराज जेव्हा जिंकले त्यावेळी शत्रू पक्षातील आया बहिणी त्यांच्या ताब्यात आल्या. मात्र त्यांनी ओटी भरून त्यांना माघारी पाठवलं. छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर होते. देशात मोदींच्या नेतृत्वाखाली शिवशाही आणि रामराज्य आणण्याचा प्रयत्न आम्ही करतो, असंही नितीन गडकरी म्हणाले.

आपल्या गाड्या चालणार आहेत. देशात इलेक्ट्रिकची गाडी, कार, स्कूटर मी आणली. शेतकऱ्याला इंधन दाता बनवण्याचं काम आम्ही केलं. आम्ही इथेनॉल आणले नसते तर पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या उसाच्या पैसे वर्षभर मिळाले नसते, असं नितीन गडकरी म्हणाले.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.