जगभरात तिरंगा फडकावणाऱ्या सचिन-गावसकरांना टिव-टिव करणारे देशभक्ती शिकवणार?

मुंबई : आपल्या समाजात सध्या विचार मांडणंही धोक्याचं आहे का? हा सवाल निर्माण झालाय. कारण, सध्या क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर आणि लिटल मास्टर सुनिल गावसकरांनाही देशद्रोही ठरवण्याचा विडा एका गटाने उचललाय. यात एका इंग्रजी चॅनलचाही समावेश आहे. हॅशटॅग अँटीनॅशनल लिहून जोरदार टीआरपी वाढवण्यासाठी या चॅनलच्या संपादकाने अकलेचे तारे तोडले आहेत. त्यानंतर सोशल मीडियावरही […]

जगभरात तिरंगा फडकावणाऱ्या सचिन-गावसकरांना टिव-टिव करणारे देशभक्ती शिकवणार?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

मुंबई : आपल्या समाजात सध्या विचार मांडणंही धोक्याचं आहे का? हा सवाल निर्माण झालाय. कारण, सध्या क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर आणि लिटल मास्टर सुनिल गावसकरांनाही देशद्रोही ठरवण्याचा विडा एका गटाने उचललाय. यात एका इंग्रजी चॅनलचाही समावेश आहे. हॅशटॅग अँटीनॅशनल लिहून जोरदार टीआरपी वाढवण्यासाठी या चॅनलच्या संपादकाने अकलेचे तारे तोडले आहेत. त्यानंतर सोशल मीडियावरही एका गटाने सचिन आणि गावसकरांना देशद्रोहाचं सर्टिफिकेट दिलं.

भारतरत्न… भारतीय वायू सेनेचा ग्रुप कॅप्टन आणि क्रिकेटचा देव असलेला सचिनला देशद्रोही म्हणणार.. इंग्रजी चॅनलच्या संपादकानेच ही आग लावून दिली आहे. सचिनसोबतच गावसकर आणि कपिल देव यांचंही या संपादकाने चर्चेत नाव घेतलं. ज्या सचिन तेंडुलकरने जगात क्रिकेटच्या माध्यमातून भारताचं नाव मोठं केलं, ज्या गावसकरांनी देशाची शान वाढवली, त्या दोघांनाही आज थेट देशद्रोही ठरवण्यात येतंय. त्याचं कारण आहे, या दोघांनीही वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळण्याचं मतं मांडलं…

पाकिस्तानसोबत खेळण्यावर सचिन काय म्हणाला?

“विश्वचषकात भारत पाकिस्तानवर नेहमीच वरचढ ठरलाय. आता पुन्हा एकदा त्यांना धूळ चारण्याची वेळ आहे. त्यांना विनाकारण दोन गुण द्यायला मला वैयक्तिकदृष्ट्याही आवडणार नाही. पण माझ्यासाठी माझा देश अगोदर आहे. त्यामुळे देश जो निर्णय घेईल मी त्या निर्णयाचं मनापासून समर्थन करेन,” अशी प्रतिक्रिया सचिनने दिली आहे.

गावकरांनीही अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचा निर्णय होईल. तर त्यात विजय कोणाचा होणार? विजय तर पाकिस्तानचाच होईल. कारण त्यांना दोन गुण मिळतील. त्यामुळे भारताला खेळलंच पाहिजे, असं मत गावकरांनी मांडलं.

ज्या क्रिकेटर्सनी भारताचा झेंडा जगभरात फडकवला त्या ट्रोलर्सने त्यांच्या रेकॉर्डवरही नजर मारणं गरजेचं आहे. सचिन तेंडुलकरने 463 वनडे मॅचमध्ये 18,426 धावा केल्यात, 49 शतकं झळकावलीत. तर 200 कसोटी सामन्यांमध्ये 15, 921 धावा करत 51 शतकं ठोकलेत.

गावकरांचंही देशासाठीचं योगदान अभिमान वाटेल असंच आहे. त्यांनी 125 कसोटी सामन्यांमध्ये 10 हजार 122 धावा केल्यात आणि त्यांच्या नावावर 34 शतकं ठोकलेत. त्यांनी धावा किती केल्या हे या क्षणाला महत्त्वाचं नसलं तर मुद्दा हाच आहे, की ज्यांनी भारताचा तिरंगा जगभरातील सर्व प्रमुख देशांमध्ये फडकवला, त्यांनाच सोशल मीडियावरचे कथित देशभक्त देशभक्ती शिकवत आहेत.

सचिन तेंडुलकरला देशाचा सर्वोच्च भारतरत्नचा पुरस्कार मिळालाय. पण आता आपलं मत व्यक्त करणंच त्यांच्यासाठी देशद्रोह ठरतोय. भारताच्या काही माजी खेळाडूंनीही भारताने पाकिस्तानसोबत खेळू नये असं म्हटलंय. प्रत्येकाचं मत वेगवेगळं असू शकतं. त्यामुळे प्रश्न हाच निर्माण होतोय की, एखाद्याचं मत किंवा भूमिका पटली नाही तर त्याला देशद्रोही ठरवणार का?. आणि मग द्रेशद्रोहाचं प्रमाणपत्र देणाऱ्या सोशल मीडियाच्या स्टंटबाजांचंही काय करायचं?

पाकिस्तानच्या माजी खेळाडूंचं मत काय?

काश्मीर प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून धुमसतोय. भारतातल्या घरगुती राजकारणाचा फायदा अनेकदा पाकिस्तानलाही मिळालाय. हाच प्रकार आता क्रिकेटमध्ये होतोय. हरभजन सिंह, सौरव गांगुली आणि सचिन-गावसकर यांच्या मतावर आता पाकिस्तानमधून माजी खेळाडूंनीही षटकार ठोकलाय. जावेद मायांदादने यावर म्हटलंय, की “मला वाटतं सौरव गांगुलीला येत्या काळात निवडणूक लढवायची असेल. पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री होण्याची त्याची इच्छा असेल म्हणूनच त्याने अशी प्रतिक्रिया दिली असावी.” स्वतःच्या फायद्यासाठीच पाकिस्तानविरोध दाखवला जातोय, असं अप्रत्यक्षपणे मियांदादने म्हटलंय.

पाकिस्तानला दोन गुण मोफत देणं देशभक्ती आहे का?

विश्वचषकात भारताने पाकिस्तानला आतापर्यंत जिंकू दिलेलं नाही हा इतिहास आहे. त्यामुळे हा प्रश्न उपस्थित होतो, की आपण खेळण्याअगोदरच माघार घेऊन पाकिस्तानला दोन गुण मोफत काय द्यायचे? सचिन तेंडुलकरनेही हेच सांगण्याचा प्रयत्न केलाय. जर नॉकआऊट सामन्यातही पाकिस्तान विरुद्ध भारत अशी स्थिती असेल तर आपण तिथेही माघार घेऊन मालिकेतून बाहेर पडणार का? हा पर्याय निवडला तर ती आपली देशभक्ती असेल का आणि यासाठी देशभरातील क्रिकेटप्रेमी तयार होतील का?

बीसीसीआयकडून जालीम उपाय

भारताने पाकिस्तानसोबत खेळावं की नाही याबाबत चर्चा सुरु असतानाच बीसीसीआयने आयसीसीला एक पत्र लिहिलंय आणि तर्कशुद्ध पद्धतीने भारताची बाजू मांडली आहे. दहशतवादाला बळ देणाऱ्या देशावर बहिष्कार टाकला जावा, अशी मागणी बीसीसीआयने आयसीसीकडे केली आहे. आयसीसीने यावर विचार केल्यास पाकिस्तान संपूर्ण विश्वचषकातूनच बाहेर केलं जाईल. वर्णभेदाच्या मुद्द्यावरुन एकदा दक्षिण आफ्रिकेलाही मालिकेतून बाहेर करण्यात आलं होतं.

आतापर्यंत कधी-कधी बहिष्कार?

भारत पाकिस्तानविरुद्ध न खेळल्यास विश्वचषकात एखाद्या संघाने प्रतिस्पर्धीवर बहिष्कार टाकण्याची ही पहिलीच वेळ नसेल. 1996 चा विश्वचषक भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेत झाला होता. तेव्हा श्रीलंकेत एलटीटीईचं आंदोलन सुरु होतं. सुरक्षेचा हवाला देत ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्धचा सामना खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे न खेळताही श्रीलंकेला दोन गुण देण्यात आले होते.

2003 च्या विश्वचषकात इंग्लंड आणि झिम्बॉम्ब्वे यांच्यातला सामना झाला नाही. झिम्बाम्ब्वेचे राष्ट्रपती रॉबर्ट मुगाबे यांच्या एका धोरणाला विरोध केल्यामुळे परिस्थिती चिघळली होती. त्यामुळे इंग्लंडने न खेळण्याचा निर्णय घेतला आणि न खेळताही झिम्बॉम्ब्वेला विजयी घोषित करण्यात आलं.

2003 च्याच विश्वचषकात आणखी एक सामना वादात सापडला होता. न्यूझीलंडने संयुक्त यजमान केनियासोबत सुरक्षेच्या कारणास्तव खेळण्यास नकार दिला होता. या सामन्यात न खेळताही केनियाला दोन गुण मिळले होते.

पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना धक्का बसणार

पाकिस्तानविरुद्ध भारताचा सामना न झाल्यास सर्वात मोठा धक्का क्रिकेटचाहत्यांना बसेल. 16 जूनला प्रस्तावित असलेल्या भारत-पाकिस्तान सामन्याची ओल्ड ट्रेफर्ड मैदानातील प्रेक्षकांची क्षमता 25 हजार एवढी आहे. पण आतापर्यंत 45 हजारांपेक्षा जास्त प्रेक्षकांनी तिकिटासाठी अर्ज केलाय. यामध्ये पाकिस्तानी चाहत्यांची संख्या जास्त आहे.

Non Stop LIVE Update
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....