रोहित शेखर हत्येप्रकरणी पत्नीला अटक, शवविच्छेदन अहवालानंतर कारवाई

| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

नवी दिल्ली : आंध्रप्रदेशचे माजी राज्यपाल आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी यांचा मुलगा रोहित शेखरच्या हत्येप्रकरणी त्यांच्या पत्नीला अटक करण्यात आले. आरोपी पत्नीचे नाव अपूर्वा शेखर असे आहे. शवविच्छेदन अहवालानंतर रोहितचा मृत्यू नैसर्गिक गळा दाबल्याने गुदमरुन झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर 3 दिवस चौकशी केल्यानंतर अपूर्वा यांना अटक करण्यात आली. उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडचे […]

रोहित शेखर हत्येप्रकरणी पत्नीला अटक, शवविच्छेदन अहवालानंतर कारवाई
Follow us on

नवी दिल्ली : आंध्रप्रदेशचे माजी राज्यपाल आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी यांचा मुलगा रोहित शेखरच्या हत्येप्रकरणी त्यांच्या पत्नीला अटक करण्यात आले. आरोपी पत्नीचे नाव अपूर्वा शेखर असे आहे. शवविच्छेदन अहवालानंतर रोहितचा मृत्यू नैसर्गिक गळा दाबल्याने गुदमरुन झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर 3 दिवस चौकशी केल्यानंतर अपूर्वा यांना अटक करण्यात आली.

उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडचे माजी दिवंगत मुख्यमंत्री एनडी तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर तिवारी यांचा मंगळवारी मृत्यू झाला होता. रोहित तिवारी 38 वर्षांचे होते. त्यांचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाल्याचे सुरुवातील सांगण्यात आले. मात्र, शवविच्छेदनात त्यांचा मृत्यू गळा दाबल्याने गुदमरुन झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला होता. तसेच तपास दिल्ली  पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे देण्यात आला.

‘पती-पत्नीमध्ये वाद’

रोहित यांची आई उज्वला यांनी रोहित आणि पत्नी अपूर्वा यांच्यात लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून वाद सुरु झाल्याचे सांगितले होते. तसेच दोघे स्वतंत्र झोपत असल्याचेही नमूद केले होते. दुसरीकडे पत्नी अपूर्वाने रोहितचे बाहेर अन्य एका महिलेसोबत संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यामुळेच आपले वाद होत असल्याचे अपूर्वाने सांगितले.

दरम्यान, रोहित यांना त्यांची आई आणि पत्नीने मॅक्स रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी त्यांचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाल्याचे सांगण्यात आले. रोहित दिल्लीच्या डिफेन्स कॉलनीमध्ये आई आणि पत्नीसह राहत होते.

रोहितच्या नव्या ओळखीचा इतिहास

रोहित शेखर तिवारी यांनी 2008 मध्ये एनडी तिवारी यांचा मुलगा असल्याचा दावा केला होता. तसेच याबाबत न्यायालयातही धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने डीएनए टेस्ट करण्याचे सुचवले. त्यानुसार रोहित आणि एन. डी. तिवारी यांची डीएनए टेस्ट करण्यात आली. त्यात रोहित हा एनडी तिवारी यांचाच मुलगा असल्याचे स्पष्ट झाले. न्यायालयाच्या निर्णयानंतर एनडी तिवारी यांनी रोहित शेखरला आपला मुलगा मानले. विशेष म्हणजे एनडी तिवारी यांनी सर्व संपत्तीचे अधिकार रोहित यांना दिले होते.

एवढंच नव्हे तर, एनडी तिवारी यांनी रोहित शेखर यांच्या आई उज्जवला यांच्याशी वयाच्या 88 व्या वर्षी लग्न केले होते. उज्वला आणि एनडी तिवारी यांचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र त्यानंतरही त्यांनी लग्न केले नव्हते. न्यायालयाच्या आदेशानंतर तिवारींनी रोहितला मुलगा मानत उज्वला यांच्याशी लखनौमध्ये 14 एप्रिल 2014 ला लग्न केले.

एनडी तिवारी यांचे वयाच्या 93 वर्षी ऑक्टोबर 2018 रोजी निधन झाले. दोन राज्यांचे मुख्यमंत्रीपद भूषवले एनडी तिवारी हे एकमेव मंत्री होते. ते तीन वेळा उत्तरप्रदेश आणि एक वेळा उत्तराखंडाचे मुख्यमंत्री होते. त्याशिवाय एनडी तिवारी यांनी आंधप्रदेशचे राज्यपाल पदही भूषवले आहे.