पुण्यातील वेगवेगळ्या महामार्गांवर मजुरांसाठी विश्रामगृहाची व्यवस्था, जिल्हा प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

| Updated on: May 10, 2020 | 11:28 AM

प्रत्येक महामार्गावरील ठराविक अंतरावर विविध टप्प्यावर मंगल कार्यालय, ढाबा अथवा अन्य सार्वजनिक ठिकाणी (Pune Rest House open Migrant Worker) सोय करावी.

पुण्यातील वेगवेगळ्या महामार्गांवर मजुरांसाठी विश्रामगृहाची व्यवस्था, जिल्हा प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Follow us on

पुणे : राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक स्थलांतरित मजूर (Pune Rest House open Migrant Worker)  आपापल्या गावी निघाले आहेत. या स्थलांतरित मजुरांसाठी पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या महामार्गांवर विश्रामगृहांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. या मजुरांना नाश्ता, जेवणाची सोय व्हावी या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

पुणे जिल्ह्यातील पुणे बंगळुरु, पुणे सोलापूर, पुणे अहमदनगर, पुणे मुंबई आणि पुणे-नाशिक या (Pune Rest House open Migrant Worker) महामार्गांवरुन अनेक मजूर परराज्यात जात आहे. तर काही जण पुण्यात येत आहे. या मजुरांना रस्त्यात जेवणाची किंवा खाण्यापिण्याची सोय व्हावी या दृष्टीने जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध सुविधा दिल्या जाणार आहेत.

या ठिकाणच्या विश्रांतीगृहात चहा, नाश्ता, भोजन आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. तसेच या विश्रांतीगृहात मजुरांना हात धुण्याची सोय, सॅनिटायझर उपलब्ध करुन द्यावं.

त्याशिवाय या विश्रामगृहात सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल या कटाक्षाने दक्षता घ्यावी. तसेच या ठिकाणी गरजेनुसार पोलीस बंदोबस्त तैनात करावा.

जिल्हा प्रशासनाच्या परवानगीनंतर ग्रामपंचायतीने ठिकठिकाणचे विश्रांतीगृह सुरु करावेत. या विश्रांतीगृहात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची नोंद ठेवावी. तसेच मजुरांचा संपर्क क्रमांक, स्वाक्षरी, पत्ता रजिस्टरमध्ये नमूद करावा. हा दैनंदिन अहवाल ग्रामपंचायतीने तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांना सादर करावा.

या विश्रांतीगृहात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची नोंद ठेवावी, मजुरांचा संपर्क क्रमांक, स्वाक्षरी, पत्ता रजिस्टरमध्ये नमूद करावं. हा दैनंदिन अहवाल ग्रामपंचायतीने तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांनी सादर करावा.

तहसीलदार गट विकास अधिकारी यांनी सदर ठिकाणी सुविधाची पाहणी करण्याची सूचना ही जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत. तहसीलदार यांनी आपत्ती व्यवस्थापन निधीतून स्थानिक ग्रामपंचायतीच्या मदतीने मजुरांची व्यवस्था करावी.

प्रत्येक महामार्गावरील ठराविक अंतरावर विविध टप्प्यावर मंगल कार्यालय, ढाबा अथवा अन्य सार्वजनिक ठिकाणी सोय करावी. याबाबत विश्रांतीगृहचा प्रस्ताव संबंधित ग्रामपंचायतीने गट तहसीलदार यांच्याकडे सादर करावा. तसेच तहसीलदारांनी त्याला त्वरित मान्यता द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाने दिल्या (Pune Rest House open Migrant Worker) आहेत.

संबंधित बातम्या :

राज्यातील पोलीस कोरोनाच्या विळख्यात, पोलिसांच्या दक्षतेसाठी गृह विभागाकडून नियमावली जारी

Pune Corona | मे महिन्याअखेरीस पुण्यातील रुग्णसंख्या 10 हजारावर पोहोचण्याचा अंदाज : आयुक्त शेखर गायकवाड