दिल्लीत कोरोनाचा कहर, अरविंद केजरीवालांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

| Updated on: Nov 19, 2020 | 1:32 PM

नवी दिल्लीतील वाढत्या कोरोना केसेसमुळे अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आलाी आहे. Arvind Kejriwal conducted all party meeting

दिल्लीत कोरोनाचा कहर, अरविंद केजरीवालांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक
Follow us on

नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. सर्वपक्षीय बैठकीला अरविंद केजरवीला यांच्यासह आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन, सौरभ भारद्वाज, भाजपकडून आदेश गुप्ता, काँग्रेसचे अनिल चौधरी आणि जयकिशन उपस्थित आहेत. दिल्लीमध्ये 28 ऑक्टोबरपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. (Arvind Kejriwal conducted all party meeting due to increasing corona cases in Delhi)

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू देखील वाढले आहेत. सर्वपक्षीय बैठक दिल्ली सचिवालय कार्यालयात सुरु आहे. अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. केजरीवाल यांनी बुधवारी गुरु तेग बहादूर रुग्णालयाचा दौरा केला होता.

दिल्लीमध्ये 28 ऑक्टोबरपासून कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली. 28 ऑक्टोबरला दिल्लीत 5 हजारांहून अधिक कोरोना रुग्णसंख्या आढळली.11 नोव्हेंबरला 8 हजार कोरोना रुग्ण आढळले होते.

कोरोना संसर्गाचे प्रमाण दिल्लीत वाढत असून बुधवारी 7486 कोरोना केसेस समोर आल्या आहेत तर 131 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या 7943 वर पोहोचली आहे. यासोबत दिल्लीतील कोरोना रुग्णसंख्येंने 5 लाखांटा टप्पा पार केला आहे. 4 लाख 52 हजार 683 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 42458 जणांवर उपचार सुरु आहेत.

दिल्लीमध्ये कोरोना संक्रमण कसं वाढलं?

दिल्लीतील कोरोना संक्रमनाचा वेग मंदावला होता. मात्र, गेल्या दोन आठवड्यात संक्रमनाचा वेग वाढला. दिल्लीत 28 ऑक्टोबर रोजी पहिल्यांदा 5 हजार 673 नवे रुग्ण आढळले होते. त्यानंतर 2 नोव्हेंबर वगळता दररोज पाच हजार पेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित आढळत आहेत.

दिल्लीत कोरोना संक्रमण वाढण्यामागे अनेक कारणं असल्याचं सांगितलं जात आहे. सणांनिमित्ताने लोक एकमेकांच्या जास्त संपर्कात आले. याशिवाय दिल्लीत प्रदूषणदेखील वाढलं आहे. त्याचबरोबर थंडीदेखील वाढली आहे. या कारणांमुळे दिल्लीत कोरोना रुग्ण वाढले आहेत.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन नागरिकांनी मास्क वापरावं, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करावं, असा सल्ला तज्ज्ञांनी दिल्लीच्या नागरिकांना दिला आहे.

देशात 83 लाख कोरोनामुक्त

भारतात बुधवारी कोरोनाचे 45 हजार 576 कोरोना रुग्ण आढळले आहेत. देशातील कोरोना रुग्णसंख्येने 89 हजारांचा टप्पा पार केला आहे. तर, 83 लाखांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. भारतामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 31 हजार 578 झाली आहे. देशात सध्या 4 लाख 43 हजार 303 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

महाराष्ट्रात बुधवारी 5011 कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. राज्यात 16 लाख 30 हजार 111 जण कोरोनामुक्त झालेत. सध्या 80221 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

संबंधित बातम्या 

दिल्लीची कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच, वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल सरसावले

पुढच्या 10 दिवसांत दिल्लीतील कोरोना नियंत्रणात येण्याची अपेक्षा : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

(Arvind Kejriwal conducted all party meeting due to increasing corona cases in Delhi)