पुढच्या 10 दिवसांत दिल्लीतील कोरोना नियंत्रणात येण्याची अपेक्षा : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

"पुढच्या आठवड्यामध्ये कोरोनाला रोखण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची पावले आम्ही उचलत आहोत. पुढील दहा दिवसांत कोरोना नियंत्रणात येईल", असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला.

पुढच्या 10 दिवसांत दिल्लीतील कोरोना नियंत्रणात येण्याची अपेक्षा : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
Follow us
| Updated on: Nov 13, 2020 | 4:16 PM

नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या वाढणाऱ्या रुग्णसंख्येला दिल्लीचं प्रदुषण एक प्रमुख कारण असल्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत. दिवाळीच्या अगोदर एक दिवस डिजीटल पत्रकार परिषद घेऊन त्यांनी वाढणाऱ्या रुग्णसंख्येवर भाष्य केलं. (Delhi Cm Arvind kejriwal Says pollutuon Has big Role in Rising Corona)

“वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे राज्य सरकार चिंतेत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जी पावले उचलायला हवीत, आम्ही ती उचलतो आहोत. पुढच्या आठवड्यामध्ये कोरोनाला रोखण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची पावले आम्ही उचलत आहोत. पुढील दहा दिवसांत कोरोना नियंत्रणात येईल”, असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला.

दिल्लीतील वाढत्या कोरोना रुग्णांचं खापर केजरीवालांनी शेजारच्या इतर राज्यांवरही फोडलं. “शेतातील कचरा जाळल्याने पूर्ण 1 महिना उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, तसंच  दिल्लीमध्ये धूर आणि प्रदुषण असते. पाठीमागच्या 10 ते 12 वर्षांपासून प्रत्येक वर्षाच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात शेतातील कचरा जाळल्याने होणाऱ्या प्रदुषणामुळे उत्तर भारत त्रस्त असतो”, असं केजरीवाल यांनी नमूद केलं.

“शेतातील कचऱ्याच्या समस्येने शेतकरी देखील परेशान असतात. परंतु आता शेतकऱ्यांना चिंता करण्याचं काही कारण नाही. कारण अ‌ॅग्रिकल्चर इन्स्टिट्यूटने यासंबंधी उपाय शोधून काढला आहे. अ‌ॅग्रिकल्चर इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी बायो डी कंपोझर बनवलंय. ज्यामुळे शेतकऱ्यांचं काम आता अधिक सोपं होऊन प्रदुषण देखील होणार नाही”, असं केजरीवाल म्हणाले.

दिल्लीत कोरोनाचं संक्रमन कसं वाढलं?

दिल्लीत कोरोना संक्रमनाचा वेग मंदावला होता. मात्र, गेल्या दोन आठवड्यात संक्रमनाचा वेग वाढला. दिल्लीत 28 ऑक्टोबर रोजी पहिल्यांदा 5 हजार 673 नवे रुग्ण आढळले होते. त्यानंतर 2 नोव्हेंबर वगळता दररोज पाच हजार पेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित आढळत आहेत.

दिल्लीत कोरोना संक्रमन वाढण्यामागे अनेक कारणं असल्याचं सांगितलं जात आहे. सणांनिमित्ताने लोक एकमेकांच्या जास्त संपर्कात आले. याशिवाय दिल्लीत प्रदूषणदेखील वाढलं आहे. त्याचबरोबर थंडीदेखील वाढली आहे. या कारणांमुळे दिल्लीत कोरोना रुग्ण वाढले आहेत.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन नागरिकांनी मास्क वापरावं, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करावं, असा सल्ला तज्ज्ञांनी दिल्लीच्या नागरिकांना दिला आहे.

कोरोना रुग्ण संख्या लवकरच कमी होणार

नवी दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट सुरु असून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, लवकरच कोरोना रुग्णांची संख्या कमी होईल, अशी आशा दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी व्यक्त केली. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.वाढत्या कोरोना रुग्ण संख्येला नागरिकांची बेपर्वाई आणि निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचही आरोग्यमंत्री जैन म्हणाले. काही लोकांना मास्क नाही घातला तर काही होत नाही, असं वाटतं हे चुकीचे आहे, असंही जैन म्हणाले.

(Delhi Cm Arvind kejriwal Says pollutuon Has big Role in Rising Corona)

संबंधित बातम्या

Corona | नवी दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट, संसर्गापासून बचावासाठी मास्क वापरा, दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट, नव्या बाधितांमध्ये प्रचंड वाढ : अरविंद केजरीवाल

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.