दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट, नव्या बाधितांमध्ये प्रचंड वाढ : अरविंद केजरीवाल

दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट, नव्या बाधितांमध्ये प्रचंड वाढ : अरविंद केजरीवाल

दिल्लीत कोरोनाची तसरी लाट आली असल्याची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली (Arvind Kejriwal said third wave of Corona in Delhi).

चेतन पाटील

|

Nov 04, 2020 | 4:09 PM

नवी दिल्ली : “दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीत कोरोनाची ही तिसरी लाट आहे, असंही म्हणता येईल”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली. केजरीवाल यांच्याआधी दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनीदेखील दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट आल्याचं मान्य केलं होतं (Arvind Kejriwal said third wave of Corona in Delhi).

दिल्लीत काल (3 नोव्हेंबर) दिवसभरात तब्बल 6 हजार 725 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. हा आकडा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासन दोघांची चिंता वाढली आहे (Arvind Kejriwal said third wave of Corona in Delhi).

दिल्लीत कोरोनाचं संक्रमन कसं वाढलं?

दिल्लीत कोरोना संक्रमनाचा वेग मंदावला होता. मात्र, गेल्या दोन आठवड्यात संक्रमनाचा वेग वाढला. दिल्लीत 28 ऑक्टोबर रोजी पहिल्यांदा 5 हजार 673 नवे रुग्ण आढळले होते. त्यानंतर 2 नोव्हेंबर वगळता दररोज पाच हजार पेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित आढळत आहेत.

दिल्लीत कोरोना संक्रमन वाढण्यामागे अनेक कारणं असल्याचं सांगितलं जात आहे. सणांनिमित्ताने लोक एकमेकांच्या जास्त संपर्कात आले. याशिवाय दिल्लीत प्रदूषणदेखील वाढलं आहे. त्याचबरोबर थंडीदेखील वाढली आहे. या कारणांमुळे दिल्लीत कोरोना रुग्ण वाढले आहेत.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन नागरिकांनी मास्क वापरावं, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करावं, असा सल्ला तज्ज्ञांनी दिल्लीच्या नागरिकांना दिला आहे.

मध्यमवर्गात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला!

दरम्यान, दिल्लीच्या कोरोना परिस्थतीतवर दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीमध्ये सुरुवातीला गरीब वस्तीमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होता. तो आता मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्गाच्या रहिवासी भागात वाढला असल्याची माहिती सत्येंद्र जैन यांनी दिली. कोरोनाबाधित रुग्ण खासगी दवाखान्यात जाणे पसंत करत आहेत. त्याचबरोबर आरोग्य विमा असणाऱ्या रुग्णांची संख्याही खासगी दवाखान्यात वाढत आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयात ICU बेड्सची संख्या कमी पडत असल्याचं जैन यांनी सांगितलं आहे.

संबंधित बातमी :

राजधानी दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट, ICU बेडसाठी ‘आप’ सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें