औरंगाबादेत कोरोनाचा कहर, 24 तासात 62 नवे रुग्ण

| Updated on: May 02, 2020 | 9:30 AM

गेल्या 24 तासात 62 नवे रुग्ण औरंगाबादेत आढळले आहे. औरंगाबाद शहराचा आकडा हा 239 वर पोहोचला (Aurangabad Corona Patient Increase) आहे.

औरंगाबादेत कोरोनाचा कहर, 24 तासात 62 नवे रुग्ण
Follow us on

औरंगाबाद : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला (Aurangabad Corona Patient Increase) आहे. औरंगाबादेत कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत जात आहे. औरंगाबादमध्ये 24 तासात 62 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे औरंगाबादेतील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 239 वर पोहोचला आहे. यामुळे औरंगाबादेत चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे.

औरंगाबादेत काल (1 मे) 39 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर आज (2 मे) औरंगाबादेत (Aurangabad Corona Patient Increase) आणखी 23 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे गेल्या 24 तासात 62 नवे रुग्ण औरंगाबादेत आढळले आहे. औरंगाबाद शहराचा आकडा हा 239 वर पोहोचला आहे. औरंगाबादेत धक्कादायक पद्धतीने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

दरम्यान औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्हा अलर्टवर आला आहे.

या पार्श्वभूमीवर औरंगाबादेत सम आणि विषमचा प्रयोग राबवणार आहे. त्यामुळे सम तारखेला सकाळी 11 पर्यंत सर्व जीवनावश्यक सेवा सुरु राहणार आहे. तर विषम तारखेला वैद्यकीय वगळता सर्व सेवा बंद राहणार आहेत.

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 11 हजार पार 

महाराष्ट्रात काल (1 मे) एकाच दिवसात 1 हजार 8 कोरोनाबाधित नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या 11 हजार 506 झाली आहे. या व्यतिरिक्त आज दिवसभरात 106 कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत राज्यभरात 1 हजार 879 रुग्ण बरे झाले. सध्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी कोरोनाच्या एकूण 9 हजार 148 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  (Aurangabad Corona Patient Increase) दिली.

संबंधित बातम्या : 

पुण्यात कोरोनाबळींचा आकडा 100 वर, एका पुरुषाचा मृत्यू

जळगावला कोरोनाचा विळखा, कोरोनाबाधिताच्या संपर्कातील आणखी चौघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह