दोन दशकं, अखंड मेहनत, वीरभद्रा नदीवर बंधारा, आता वाळूपट्ट्यावर अधिकाऱ्यांची नजर, पैठणचं नांदर गाव तापलं!

ग्रामपंचायतीने ठराव दिलेला असताना उपविभागीय अधिकारी मोरे यांनी याच प्रश्नावर आता 9 मार्च रोजी ग्रामसभा बोलवली आहे. प्रशासानाच्या दबावासमोर नांदर ग्रामस्थ झुकतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दोन दशकं, अखंड मेहनत, वीरभद्रा नदीवर बंधारा, आता वाळूपट्ट्यावर अधिकाऱ्यांची नजर, पैठणचं नांदर गाव तापलं!
सांकेतिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 4:02 PM

औरंगाबादः पैठण तालुक्यात (Paithan) वीरभद्रा नदीचा (Veerbhadra River)  किनारा लाभलेला नांदर गाव. आपल्या गावातल्या नदीपात्रातून वाळूचा उपसा होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी कंबर कसली. मागील दोन दशकांपासून डोळ्यात तेल घालून नदीपात्राची सेवा केली. सामाजिक संस्था आणि लोकसहभागातून बंधारा बांधला. गावकऱ्यांच्या अथक मेहनतीचं फळ मिळालं. नदीपात्राता दाणेदार वाळूची रास जमा झाली. मात्र महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची नजर या वाळूवर पडलीय. येथील दोन वाळूपट्ट्यांचा लीलाव (Sand Strip Auction) करण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. पण ग्रामस्थ मात्र या निर्णयामुळे संतप्त झालेत. याच मुद्द्यावर आज 9 मार्च रोजी अधिकाऱ्यांनी ग्रामसभा आयोजित केली आहे. आता प्रशासनविरुद्ध ग्रामसभा अशी स्थिती आहे.

वीरभद्रा नदीची अहोरात्र सेवा

पैठण तालुक्यातील नांदर गावातून वीरभद्रा नदीपात्रातील वाळूचा लिलाव होऊ नये म्हणून, गेल्या दोन दशकांपासून नांदर ग्रामस्थांनी यशस्वी प्रयत्न केले. यंदाही गावातील वाळूपट्ट्याचा लिलाव करू नये म्हणून ग्रामपंचायतीनं महसूल विभागाला ठराव दिला आहे. मात्र वाळू पट्ट्याच्या लिलावासाठी आता महसूल विभागही हट्टाला पेटला आहे. येथील दोन वाळू पट्ट्यांच्या लिलावासाठी पैठण-फुलंब्री उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे यांनी पुढाकार घेतला आहे. अधिकाऱ्यांनी आता ग्रामसभा आयोजित केली असल्याने प्रशासन हवा तसा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नांदर गावातलं वातावरण चांगलंच तापला आहे.

प्रशासनाच्या दबावापुढे गावकरी झुकणार का?

नांदरच्या वाळूपट्ट्याचा लिलाव करू नये, असा ठराव नांदर ग्रमपंचायतीने 10 जून 2021 रोजी पैठण तहसील कार्यालयात सादर केला. उपलब्ध असलेला वाळूपट्ट्याचा लिलाव करून महसुलात वाढ करण्यासाठी पैठण महसूल अधिकारी एकवटले आहेत. ग्रामपंचायतीने ठराव दिलेला असताना उपविभागीय अधिकारी मोरे यांनी याच प्रश्नावर आता 9 मार्च रोजी ग्रामसभा बोलवली. प्रशासानाच्या दबावासमोर नांदर ग्रामस्थ झुकतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

इतर बातम्या-

कोण ठरल्या औरंगाबादच्या वेगवान धावपटू? AWIS तर्फे आयोजित स्प्रिंट रेसमध्ये 900 पेक्षा जास्त जणींचा सहभाग

धावा धावा विहिरीत अस्वल पडलं, गावात नुसता धुमाकूळ, वन विभागानं उतरून पाहिलं तर निघाला….

लग्नानंतरही भेटण्यासाठी पाठलाग, विवाहितेनं आयुष्य संपवलं, नांदेडमधली धक्कादायक घटना

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.