AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे गाणं ऐकताच आंदोलकांमध्ये येतो जोश, 69 वर्षांपासून लोकप्रिय, प्रत्येक लढ्यात ऐकायला मिळते

69 वर्षांपूर्वीचं दिलीप कुमार यांचं गाणं, जे आजही प्रत्येक आंदोलनाची वाढवते शान, मोहम्मद रफी यांचा आवाज ऐकताच आंदोलकांमध्ये येतो जोश. तुम्ही ऐकलं तरी म्हणाल....

हे गाणं ऐकताच आंदोलकांमध्ये येतो जोश, 69 वर्षांपासून लोकप्रिय, प्रत्येक लढ्यात ऐकायला मिळते
Image Credit source: Social media
| Updated on: Jul 23, 2026 | 9:49 PM
Share

हिंदी चित्रपटसृष्टीत दरवर्षी शेकडो गाणी प्रदर्शित होतात. त्यापैकी अनेक गाणी काही काळ लोकप्रिय ठरतात आणि नंतर काळाच्या ओघात लोक ती गाणी विसरून जातात. मात्र काही गाणी अशी असतात, जी केवळ चित्रपटापुरती मर्यादित राहत नाहीत तर समाजाच्या भावविश्वाचा आणि जनजीवनाचा अविभाज्य भाग बनतात. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या ‘नया दौर’ या चित्रपटातील ‘साथी हाथ बढ़ाना…’ हे गाणे अशाच अजरामर गाण्यांपैकी एक मानले जाते.

सुमारे 69 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या गीताची लोकप्रियता आजही कायम आहे. विविध आंदोलने, सामाजिक मोहिमा, जनजागृती अभियान किंवा अन्यायाविरोधातील लढ्यांमध्ये हे गाणं लोकांमध्ये एकजूट, धैर्य आणि संघर्षाची प्रेरणा देताना ऐकायला मिळते. एकत्र येऊन संकटांचा सामना करण्याचा संदेश देणारे हे गाणं आजही तितकेच लोकप्रिय आहे.

चित्रपटातील प्रसंग, पण संदेश काळाच्या पलीकडचा

1957 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नया दौर’ या चित्रपटात हे गाणे एका अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगी दाखवण्यात आले आहे. गावातील लोक आपल्या हक्कांसाठी आणि भविष्यासाठी एकत्र येऊन रस्ता बांधण्याचे काम करत असतात. त्या संघर्षमय प्रसंगात हे गाणं त्यांच्या एकजुटीचे आणि सामूहिक श्रमाचे प्रतीक बनते.

मात्र या गाण्याचा आशय केवळ चित्रपटातील कथानकापुरता मर्यादित राहत नाही. ‘एकत्र या, एकमेकांचा हात धरा आणि हार मानू नका,’ हा सार्वकालिक संदेश या गाण्यातून दिला गेला आहे. त्यामुळेच काळ बदलला, परिस्थिती बदलली, पिढ्या बदलल्या तरी या गाण्याचे महत्त्व कमी झालेले नाही.

आंदोलनांपासून सामाजिक मोहिमांपर्यंत कायमची साथ

विद्यार्थी आंदोलने, कामगारांचे मोर्चे, सामाजिक न्यायासाठीचे लढे, जनजागृती मोहिमा किंवा लोकहिताच्या विविध चळवळींमध्ये ‘साथी हाथ बढ़ाना…’ हे गाणं आजही उत्साहाने गायले जाते. एकी, संघर्ष आणि आशावादाचा संदेश देणारे हे गाणे प्रत्येक काळात आणि प्रत्येक पिढीने स्वीकारले आहे.

या अजरामर गाण्याला स्वरसम्राट मोहम्मद रफी आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी आपल्या मधुर आवाजाने अमर केले. गाण्याचे बोल प्रख्यात गीतकार साहिर लुधियानवी यांनी लिहिले, तर त्याला संस्मरणीय संगीत दिग्दर्शक ओ. पी. नैय्यर यांनी संगीतबद्ध केले.

Follow Us
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लव
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लवकरच आंदोलनाचा इशारा
एकनाथ शिंदे मीनाक्षी शिंदेंना का वाचवत आहेत? राम पूर्णेकरांचा थेट सवाल
Ram Purnekar : एकनाथ शिंदे मीनाक्षी शिंदेंना का वाचवत आहेत? राम पूर्णेकरांचा थेट सवाल
दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट! 344 कोटींचा निधी मंजूर,
दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट! 344 कोटींचा निधी मंजूर, खात्यात किती रुपये होणार जमा?
कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरेंची आज सभा
Raj Thackeray Sabha Update : कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरेंची आज सभा