SS Rajamouli Corona | ‘बाहुबली’चे दिग्दर्शक राजामौलींना कोरोना, कुटुंबालाही लागण

| Updated on: Jul 30, 2020 | 12:30 AM

बाहुबली सिनेमाचे दिग्दर्शक एस. एस. राजामौलींना कोरोनाची लागण झाली (Bahubali director SS Rajamouli Covid Positive) आहे.

SS Rajamouli Corona | बाहुबलीचे दिग्दर्शक राजामौलींना कोरोना, कुटुंबालाही लागण
Follow us on

मुंबई : बाहुबली सिनेमाचे दिग्दर्शक एस. एस. राजामौलींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासह संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांनी स्वत:च ट्विट करत याबाबतची माहिती दिली. (Bahubali director SS Rajamouli Covid Positive)

“काही दिवसांपूर्वी माझ्या कुटुंबातील काही जणांना ताप येत होता. त्यावर डॉक्टरांकडून औषध घेतल्यावर ताप कमी झाला. मात्र तरीही खबरदारी म्हणून आम्ही कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला.

“मी आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांनी कोरोना चाचणी केली. या चाचणीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने आम्हाला घरातच सेल्फ क्वारंटाईन करण्यात आले आहे. आमच्या कुटुंबातील कोणालाही कोरोनाची लक्षण नाहीत. मात्र सरकार नियमानुसार आम्ही सावधानी घेत आहोत,” असे ट्विट एस. एस. राजामौली यांनी केले आहेत.

प्लाझ्मा दान करणार

तसेच राजमौली यांनी प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला आहे. “मी आणि माझ्या कुटुंबाने कोरोनामुक्त झाल्यानंतर प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरुन इतरांना लवकर कोरोनामुक्त होता येईल,” असे ट्विट राजमौली यांनी केले आहे.

दरम्यान राजमौली हे सध्या हैद्राबादमध्ये राहतात. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी रामा राजामौला आणि मुलगी एसएस मयूखा राहतात. (Bahubali director SS Rajamouli Covid Positive)

संबंधित बातम्या : 

ना मतभेद, ना आर्थिक चणचण, मयुरीचा पती आशुतोषच्या आत्महत्येचं कारण काय.?

सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर बिहार पोलीस मुंबईत, रिया चक्रवर्ती अटकपूर्व जामिन अर्जाच्या तयारीत