“काश्मीरमध्ये घर किंवा सासरवाडी नको, फक्त तिरंग्यात गुंडाळलेले सैनिकांचे मृतदेह थांबवा”

| Updated on: Aug 12, 2019 | 7:49 AM

कलम 370 मध्ये बदल करून जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा हटवल्यानंतर राजकीय कार्यकर्त्यांपासून अनेक नेत्यांनी जम्मू काश्मीरमधील स्त्रीयांविषयी आक्षेपार्ह वक्तव्यं केली आहेत. या सर्वांच्या गर्दीत भारताचा कुस्तीपटू बजरंग पूनिया याने शांततेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

काश्मीरमध्ये घर किंवा सासरवाडी नको, फक्त तिरंग्यात गुंडाळलेले सैनिकांचे मृतदेह थांबवा
Follow us on

नवी दिल्ली: कलम 370 मध्ये बदल करून जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा हटवल्यानंतर राजकीय कार्यकर्त्यांपासून अनेक नेत्यांनी जम्मू काश्मीरमधील स्त्रीयांविषयी आक्षेपार्ह वक्तव्यं केली आहेत. या सर्वांच्या गर्दीत भारताचा कुस्तीपटू बजरंग पूनिया याने शांततेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने ट्विट करत काश्मीरकडून काहीच नको, केवळ तेथून शहीद होऊन तिरंग्यात गुंडाळलेले सैनिक यायचे थांबवा, अशी विनंती केली आहे.


बजरंग पूनिया म्हणाला, “काश्मीरमध्ये सासरवाडी पण नको आणि घरही नको. फक्त आता असा भारत पाहिजे जेथे कोणताही सैनिक तिरंग्यात गुंडाळून येणार नाही. जय हिंद, जय भारत.”

बजरंग पूनियाच्या या ट्विटच्या एक दिवस अगोदर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी एका सभेत बोलताना म्हटले होते, “कलम 370 संपल्यानंतर काही लोक काश्मीरमधून लग्नासाठी सूना आणता येतील असं म्हणत आहेत.”

याआधी उत्तर प्रदेशचे भाजप आमदार विक्रम सिंह सैनी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना काश्मीरच्या महिलांशी लग्न करण्याच्या अधिकाराचा फायदा घ्या, असं सांगितलं होतं.