सोलापुरात बँक ऑफ महाराष्ट्राचा स्लॅब कोसळला, ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले

| Updated on: Jul 31, 2019 | 1:41 PM

सोलापुरात बँक ऑफ महाराष्ट्राचा स्लॅब कोसळला आहे. स्लॅब कोसळल्यामुळे 6 जण जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना करमाळा येथे घडली.

सोलापुरात बँक ऑफ महाराष्ट्राचा स्लॅब कोसळला, ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले
Follow us on

सोलापूर : सोलापुरात बँक ऑफ महाराष्ट्राचा (Bank of Maharashtra) स्लॅब कोसळला आहे. स्लॅब कोसळल्यामुळे एकाचा मृत्यू झाला आहे, तर 15 जण जखमी झाले आहेत. यामध्ये 20 ते 25 जण बँकेचे कर्मचारी आणि बँकेत आलेले नागरिक यामध्ये अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना करमाळा येथे घडली. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.

स्लॅब कोसळ्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी स्थानिकही अग्निशमन दलाच्या जवानांना मदत करत आहेत. या दुर्घटनेत 15 जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सध्या राज्यात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे अनेक ठिकाणी जुन्या इमारती कोसळत आहे, तर कुठे स्लॅब कोसळत आहे. यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहे. नुकतेच काही दिवासंपूर्वी उल्हानसनगरमध्ये घराचा स्लॅब कोसळ्याने 7 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता.

दरम्यान,घटनास्थळी दोन जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा हटवण्याचे काम सुरु आहे. तर या घटनेमुळे परिसरात लोकांची गर्दी झाली आहे. ढिगाऱ्यात अजून काही जण अडकली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.