मोबाईल चोरीच्या संशयातून 2 तरुणांना विवस्त्र करुन बेदम मारहाण

| Updated on: Feb 21, 2020 | 4:16 PM

कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये मोबाईल चोरीच्या संशयावरून 2 तरुणांना विवस्त्र करुन बेदम मारहाण करण्यात आली आहे.

मोबाईल चोरीच्या संशयातून 2 तरुणांना विवस्त्र करुन बेदम मारहाण
Follow us on

ठाणे : कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये मोबाईल चोरीच्या संशयावरून 2 तरुणांना विवस्त्र करुन बेदम मारहाण करण्यात आली आहे (Beating on suspicious about stealing). याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी मारहाण करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी व्यापाऱ्याचा शोध सुरु आहे.

कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात मागील काही काळापासून मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या भाजीपाला विभागात 2 तरुण फिरताना दिसले असता एका व्यापाऱ्याने त्यांच्यावर मोबाईल चोरीचा संशय घेतला. व्यापाऱ्याने कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता दोघांना विवस्त्र करून मारहाण केली. एवढेच नव्हे तर दोघांची धिंडही काढण्यात आली. तेथे जमलेल्या जमावाने पीडित तरुणांना मारहाणही केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

मनीष गोसावी आणि सिद्धूक गुजर अशी पीडित तरुणांची नावं आहेत. हा सर्व प्रकार बघून मार्केटमधील व्यापारी सलमान शेख यांनी याची माहिती पोलिसांना दिली. सामाजिक कार्यकर्ते महेंद्र मिरजकर आणि सलमान शेख यांच्या पुढाकाराने हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचलं. टीव्ही 9 वर बातमी दाखवल्यानंतर बाजारपेठ पोलिसांची पळापळ सुरु झाली. पोलिसांनी तरुणांना मारहाण करणाऱ्या 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. व्हिडीओ आणि सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरु केला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक यशवंत चव्हाण यांनी दिली.

चोरीचा संशय घेऊन मारहाण करण्यात आलेल्या पीडित तरुणांची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का हेही तपासलं जात आहे. असं असलं तरी कुणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. पोलीस आणि न्यायालयच दोषी कोण आणि त्यांना काय शिक्षा द्यायची ठरवतील, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे.

Beating on suspicious about stealing