बीडमध्ये पुन्हा ‘चिअर्स’! पहिल्याच दिवशी 62 हजार लिटर मद्याची विक्री

| Updated on: May 28, 2020 | 11:48 AM

28 हजार 469 लिटर देशी दारु, 19 हजार 63 लिटर विदेशी दारु, तर 14 हजार 586 लिटर बिअर विक्री करण्यात आली. (Beed Liquor Stores Reopen during Corona Lockdown)

बीडमध्ये पुन्हा चिअर्स! पहिल्याच दिवशी 62 हजार लिटर मद्याची विक्री
Follow us on

बीड : लॉकडाऊनच्या काळात दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ मद्यविक्री बंद राहिल्याने तळीरामांचे प्राण कंठाशी आले होते. बीड जिल्ह्यात दारु विक्रीला परवानगी मिळाल्यानंतर एकाच दिवसात तब्बल 62 हजार लिटर मद्य विक्री झाली. (Beed Liquor Stores Reopen during Corona Lockdown)

लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद करण्यात आल्या होत्या. यामध्ये दारुचीही दुकाने बंद होती. मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने दारु दुकाने उघडण्यास परवानगी मिळाली.

दारुची दुकाने उघडल्यानंतर जिल्हाभर दुकानांसमोर मद्यप्रेमींच्या रांगा बघायला मिळाल्या. काही ठिकाणचा गोंधळ वगळता अनेक ठिकाणी मद्यप्रेमींनी अगदी शिस्तीत सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन केल्याचे दिसून आले.

हेही वाचा : नागपुरात सव्वा महिन्यातील मद्यविक्रीचा महसूल अवघ्या 11 दिवसात

पहिल्याच दिवशी बीड जिल्ह्यात 62 हजार लिटर दारु व्रिकी झाल्याची नोंद आहे. 28 हजार 469 लिटर देशी दारु, 19 हजार 63 लिटर विदेशी दारु, तर 14 हजार 586 लिटर बिअर विक्री करण्यात आली.

दरम्यान, ‘कोरोना’ लॉकडाऊनच्या काळात मद्यविक्री पुन्हा सुरु झाल्यापासून उत्पादन शुल्क विभागातील महसूल मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसत आहे. नागपुरात मद्यविक्रीतून अवघ्या 11 दिवसात तब्बल 38 कोटी रुपयांचा महसूल गोळा झाला. पूर्वी दिवसाला एक कोटींचा महसूल नागपूर जिल्ह्यातून मिळायचा, पण लॉकडाऊनच्या काळात नागपूरकरांनी मोठ्या प्रमाणात दारु खरेदी केली. त्यामुळे सव्वा महिन्याच्या कालावधीत जमा होणारा महसूल सरकारच्या तिजोरीत केवळ 11 दिवसांत जमा झाला.

मे महिन्याच्या अखेपर्यंत 2100 कोटी रुपयांचा महसूल राज्य सरकारला अपेक्षित आहे. 4 मेपासून राज्यात मद्यविक्री सुरु झाल्याने 28 दिवसात 2100 कोटी मिळण्याची आशा आहे. भारतात 45 दिवसाहून अधिक काळ ‘लिकर स्टोअर्स’ बंद होती.