बिल गेट्स यांचा मायक्रोसॉफ्टला ‘अलविदा’, जागतिक आरोग्यासह महत्त्वाच्या विषयांवर काम करणार

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश असलेल्या बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळावरुन राजीनामा दिला आहे (Bill Gates resigns from Microsoft).

बिल गेट्स यांचा मायक्रोसॉफ्टला 'अलविदा', जागतिक आरोग्यासह महत्त्वाच्या विषयांवर काम करणार
बिल गेट्स यांच्या 20 वर्षे जुन्या अफेअरबाबत बोर्डाने घेतला हा निर्णय

सिटल (वॉशिंग्टन) : मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक (Microsoft Co-Founder) आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये समावेश असलेल्या बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळावरुन राजीनामा दिला आहे (Bill Gates resigns from Microsoft). त्यांना यापुढील काळात जागतिक आरोग्यासह शिक्षण, विकास आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर काम करायचं आहे. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती मायक्रोसॉफ्टने शुक्रवारी दिली. असं असलं तरी ते कंपनीचे मुख्य कार्यक्रारी अधिकारी (CEO) सत्या नडेला यांचे टेक्निकल अॅडव्हायजर म्हणून काम करत राहणार आहेत.

बिल गेट्स आगामी काळात जागतिक आरोग्य (Global Health), विकास (Development), शिक्षण (Education) आणि जागतिक हवामान बदल (Climate Change) यांसारख्या मुद्द्यांवर काम करणार आहेत. यासाठीच त्यांनी मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळाच्या सदस्यपदावरुन राजीनामा दिला. राजीनाम्यानंतरही ते मायक्रोसॉफ्टच्या सीईओ आणि इतर अधिकाऱ्यांचे तांत्रिक सल्लागार म्हणून काम पाहणार आहेत.


आपल्या या निर्णयाची घोषणा करताना बिल गेट्स म्हणाले, “ही कंपनी नेहमीच माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग राहिल. मी यापुढेही कंपनीच्या नेतृत्वाच्या कामात सहभागी असेल. जीवनातील हे वळण मैत्री आणि सहकार्य ठेवण्यासाठी संधी आहे असं मी मानतो. या कंपन्यांमध्ये योगदान देणे हा माझ्यासाठी अभिमानाचा भाग आहे. मात्र, यासोबत मी जगातील काही सर्वात कठिण आव्हानांचा सामना करावा. ही माझी जबाबदारी आहे.”

मायक्रोसॉफ्टचा इतिहास

बिल गेट्स (Bill Gates) यांनी 1975 मध्ये तारुण्यात अर्ध्यावरच आपलं कॉलेज सोडलं. त्यानंतर ते न्यू मॅक्सिकोमध्ये अल्बुकर्क (Albuquerque) येथे आले. या ठिकाणी त्यांनी आपला लहानपणीचा मित्र पॉल एलनसोबत मायक्रोसॉफ्टची स्थापना केली. 2018 मध्ये पॉल एलन यांचा मृत्यू झाला. 1980 मध्ये मायक्रोसॉफ्टने आयबीएमसोबत (IBM) एकत्र येऊन ऑपरेटिंग सिस्टम (Operating System) तयार केली. नंतर ही सिस्ट एम एस डॉस (MS-DOS) नावाने ओळखली गेली.

मायक्रोसॉफ्ट 1986 मध्ये खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहचली. त्यानंतर एका वर्षातच वयाच्या 31 व्या वर्षी बिल गेट्स जगातील अब्जपती बनले. ते सर्वात कमी वयाचे अब्जपती ठरले. गेट्स 2000 पर्यंत कंपनीचे सीईओ होते. त्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीच्या नावाने “बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन” (Bill and Melinda Gates Foundation NGO) या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. गेट्स आपला सर्वाधिक वेळ या संस्थेच्या कामासाठीच देतात. याचाच भाग म्हणून त्यांनी भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये स्वतः जाऊन भेटी दिल्या. तसेच या देशांमधील महत्त्वाचे प्रश्न समजून घेत त्यात कामासाठी पुढाकार घेतला.

Bill Gates resigns from Microsoft

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI