बर्थ डे स्पेशल : हिटलरने कधीही न समोर येऊ दिलेले फोटो

| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

मुंबई : हिटलर नाव ऐकलं तरी आज डोळ्यासमोर हुकूमशाह उभा राहतो. संपूर्ण जगात हिटलरने आपली एक वेगळी प्रतिमा तयार केली. आजही अनेकांच्या तोंडी हिटलरचे नाव घेतले जाते. तसेच प्रत्येक राजकारणातील नेताही एकमेकांवर टीका करताना हिटलरची उपमा देत असतो. हुकूमशाहाचा बादशाह म्हणूनही हिटलरकडे पाहिले जाते. जगभरात हुकूमशाह म्हणून नावारुपास आलेल्या हिटलरचा आज (20 एप्रिल 1889) जन्मदिवस […]

बर्थ डे स्पेशल : हिटलरने कधीही न समोर येऊ दिलेले फोटो
Follow us on

मुंबई : हिटलर नाव ऐकलं तरी आज डोळ्यासमोर हुकूमशाह उभा राहतो. संपूर्ण जगात हिटलरने आपली एक वेगळी प्रतिमा तयार केली. आजही अनेकांच्या तोंडी हिटलरचे नाव घेतले जाते. तसेच प्रत्येक राजकारणातील नेताही एकमेकांवर टीका करताना हिटलरची उपमा देत असतो. हुकूमशाहाचा बादशाह म्हणूनही हिटलरकडे पाहिले जाते. जगभरात हुकूमशाह म्हणून नावारुपास आलेल्या हिटलरचा आज (20 एप्रिल 1889) जन्मदिवस आहे. जन्मदिनानिमित्त हिटलरचे असे काही फोटो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, जे हिटलरने कधी समोर येऊ दिले नाहीत.

जर्मनीमध्ये मोठ्या प्रमाणात लोक हिटलरच्या स्टाईलचे दिवाने झाले होते. दुसऱ्या महायुद्धात हिटलरने महत्त्वाची भूमिका बजवाली होती. मोठ्या संख्येने लोक हिटलरचे समर्थन करत होते, तर काहीजण विरोधात होते. आजपासून 75 वर्षापूर्वी हिटलरने मीडिया, जनसंपर्क आणि भाषण लोकांसाठी किती महत्त्वाचे आहे, हे त्याने ओळखलं होते. प्रत्येक भाषणाआधी हिटलर भाषणाचा सराव करायचा आणि त्यानंतर तो लोकांसमोर भाषण करायचा. विशेष म्हणजे भाषणाच्या सराव दरम्यान तो बोलण्याची पद्धत आणि हातांचे हावभाव या गोष्टींचाही सराव करायचा. यामुळे लोकांसमोर बोलताना त्यांच्यावर भाषणाचा प्रभाव पडेल.

हिटलर हुकूमशहा असल्यामुळे तो आपल्या फोटोची नेहमी काळजी घ्यायचा. तो असा फोटो लोकांपर्यंत पोहचवायचा ज्यामध्ये हिटलर आकर्षक दिसेल. छान आणि आकर्षक असे फोटो काढण्यासाठी हिटलरने खासगी फोटोग्राफर हेनरीच हॉपमॅनला आपल्या टीममध्ये घेतले होते. हा फोटोग्राफर हिटलरचा खास मित्र होता. जर्मनीमधील पोस्टल स्टॅम्प, पोस्टकार्डस, पोस्टर्स आणि पिक्चर बुकवर हॉफमॅन याने काढलेले फोटो नेहमी लावले जात असे. या फोटोंच्या बदल्यात जी रॉयल्टी मिळायची त्यामध्ये हिटलरसोबत हॉफमॅनलाही वाटा मिळायचा. यामुळे दोघंही अब्जाधीश बनले.

हॉफमॅनने फक्त लोकांमधील फोटो काढले नाही, तर त्याने हिटलर सराव करतानाचेही फोटो काढले होते. हिटलरने सराव करतानाचे फोटो जाळून टाकण्याचे आदेश दिले होते. मात्र हॉफमॅने ते लपून ठेवले. यानंतर इंग्रजांनी हिटलरला अटक केली. यावेळी या फोटोंची निगेटिव्ह कॉपीही जप्त करण्यात आली. आता 70 वर्षानंतर हे फोटो सर्वांसमोर आले आहेत.