AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या

बीड : भाजप नगरसेवक विजय जोगदंड यांची अंबाजोगाईत हत्या करण्यात आली आहे. जोगदंड यांच्यावर अज्ञातांनी तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात जोगदंड यांचा मृत्यू झाला. बीडच्या अंबाजोगाई परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. विजय जोगदंड यांच्या हत्येनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यातील अज्ञात आरेपी सध्या फरार आहेत. आज शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. […]

बीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM
Share

बीड : भाजप नगरसेवक विजय जोगदंड यांची अंबाजोगाईत हत्या करण्यात आली आहे. जोगदंड यांच्यावर अज्ञातांनी तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात जोगदंड यांचा मृत्यू झाला. बीडच्या अंबाजोगाई परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. विजय जोगदंड यांच्या हत्येनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यातील अज्ञात आरेपी सध्या फरार आहेत. आज शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.

बीडच्या अंबाजोगई परिसरात काही किरकोळ भांडणं सुरु होती. विजय जोगदंड हे तिथे भांडणं सोडवायला गेले होते. मात्र, या भांडणातील अज्ञातांनी जोगदंड यांनांच लक्ष्य केले. त्यानंतर हा वाद इतका विकोपाला गेला की, त्या अज्ञातांनी तलवारी काढल्या आणि नगरसेवक जोगदंड यांच्यावर तलवारीने सपासप वार केले, यामुळे जोगदंड तेथेच कोसळले. जोगदंड यांच्यावर वार करुन अज्ञातांनी घटनास्थळावरुन पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विजय जोगदंड यांना परिसरातील नागरिकांनी तात्काळ बीडच्या शासकीय रुग्णालात दाखल केले. मात्र तिथे उपचाराअंती त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा केला जात आहे. मात्र, अद्याप कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही. तरी पोलीस ते अज्ञात कोण होते आणि ही हत्या का झाली, याचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहेत.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...