Vijay Raaz | विनयभंगाच्या आरोपाखाली अटक झालेल्या ‘कौआ बिर्याणी’ फेम अभिनेता विजय राजला जामीन!

| Updated on: Nov 03, 2020 | 7:46 PM

‘शेरनी’ चित्रपटाचे सर्व कलाकार आणि स्टाफ हे गोंदियातील प्रसिद्ध हॉटेल ‘गेटवे’ येथे मागील पंधरा दिवसांपासून वास्तव्यास आहेत.

Vijay Raaz | विनयभंगाच्या आरोपाखाली अटक झालेल्या कौआ बिर्याणी फेम अभिनेता विजय राजला जामीन!
Follow us on

गोंदिया : विनोदी अभिनेता विजय राजवर गोंदियात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून, गोंदियातून त्याला अटक करण्यात आली होती.  मात्र, मंगळवारी गोंदिया सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज मंजूर करत सुटका केली आहे. अभिनेत्री विद्या बालन प्रमुख भूमिका साकारत असलेला आगामी चित्रपट ‘शेरनी’ची चित्रीकरण सध्या मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात सुरू आहे. या चित्रपटात विनोदी अभिनेता विजय राजदेखील (Actor Vijay Raaz) महत्त्वाची भूमिका सकारात होते. मात्र, या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान त्यांच्यावर छेडछाडीचा आरोप लावण्यात आला होता. क्रू मेंबरमधल्या 30 वर्षीय युवतीची छेड काढल्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल करून विजय राजला अटक (Arrested) करण्यात आली होती. (Bollywood Actor Vijay Raaz Arrested for molesting co-star in Balaghat)

‘शेरनी’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान, गोंदियातील हॉटेल गेटवे येथे कॉमेडियन, अभिनेता विजय राजने सहकारी स्टाफ असलेल्या 30 वर्षीय युवतीची छेडछाड केल्याने विजय राज याच्यावर गोंदियाच्या राम नगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, रात्री उशिरा अटकही करण्यात आली होती.

‘शेरनी’ चित्रपटाचे सर्व कलाकार आणि स्टाफ हे गोंदियातील प्रसिद्ध हॉटेल ‘गेटवे’ येथे मागील पंधरा दिवसांपासून वास्तव्यास आहेत. चित्रिकरणादरम्यान आणि हॉटेलमध्ये अभिनेता विजय राज यांनी आपली छेड काढल्याचे पीडित तरुणीने म्हटले आहे. युवतीची छेड काढल्याच्या तक्रारीवरून गोंदियातील रामनगर पोलीसांनी विनयभंग केल्याप्रकरणी कलम 354 (अ,ड) अन्वये गुन्हा दाखल करुन विजय राज यांना अटक केली होती. मात्र, या विषयी अधिक काही सांगण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. (Bollywood Actor Vijay Raaz Arrested for molesting co-star in Balaghat)

दरम्यान, चित्रपटांत आपल्या अचूक टायमिंगमुळे विनोदी अभिनेता अशी ख्याती मिळवलेल्या विजय राज यांच्यावर अशा प्रकार आरोप झाल्यामुळे आणि त्यांना अटक झाल्यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.

विनोदी भूमिकांनी दिली प्रसिद्धी

मूळच्या दिल्लीच्या या अभिनेत्याने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिनयाच्या ओढीने मुंबई गाठली. करिअरच्या सुरुवातीला अनेक लहानमोठ्या भूमिका केल्या. राम गोपाल वर्मांच्या ‘जंगल’ या चित्रपटात त्याने दुय्यम पण महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. जेष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी त्याला एनएसडीमध्ये काम करताना पाहिले होते. त्याचे काम पाहून नसीरुद्दीन शाहनी त्याला महेश मथाई यांच्या ‘भोपाळ एक्स्प्रेस’ आणि ‘मॉन्सून वेडिंग’ या चित्रपटासाठी मीरा नायरकडे जाण्याचा सल्ला दिला होता. (Bollywood Actor Vijay Raaz Arrested for molesting co-star in Balaghat)

‘मॉन्सून वेडिंग’ या चित्रपटाच्या यशानंतर विजय राजला बर्‍याच भूमिका मिळाल्या. मुख्य अभिनेता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट ‘रघु रोमिओ’ हा बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला. यामध्ये विजय राजने एका गोंधळलेल्या मध्यम वर्गीय माणसाची भूमिका साकारली होती.

‘रन’ या 2004मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने त्याला खऱ्या अर्थाने विनोदी अभिनेता म्हणून ओळख मिळवून दिली. ‘धमाल’ या चित्रपटातील त्याची भूमिका फार गाजली. अभिनयाव्यतिरिक्त तो व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून देखील काम करतो.

(Bollywood Actor Vijay Raaz Arrested for molesting co-star in Balaghat)