Meenakshi Seshadri Birthday Special | यशाच्या शिखरावर असताना चित्रपटसृष्टीला ‘रामराम’, ‘या’ कारणामुळे मीनाक्षी शेषाद्रीचे परदेशागमन!

90च्या दशकांत अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीने आपल्या अभिनयाच्या जोरावर अवघ्या मनोरंजन विश्वाला भुरळ घातली होती.

Meenakshi Seshadri Birthday Special | यशाच्या शिखरावर असताना चित्रपटसृष्टीला ‘रामराम’, ‘या’ कारणामुळे मीनाक्षी शेषाद्रीचे परदेशागमन!
| Updated on: Nov 16, 2020 | 12:04 PM

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री (Meenakshi Seshadri) आज (16 नोव्हेंबर) आपला 56वा वाढदिवस साजरा (Birthday Special) करत आहे. 90च्या दशकांत अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीने आपल्या अभिनयाच्या जोरावर अवघ्या मनोरंजन विश्वाला भुरळ घातली होती. आपल्या चित्रपट कारकीर्दीत मीनाक्षीने अनेक सुपरडुपर हिट चित्रपट दिले आहेत. आपल्या अभिनयाच्या खास शैलीने लोकांच्या हृदयात स्वतःचे हक्काचे स्थान निर्माण केले आहे. इतकी प्रसिद्धी मिळूनही यशाच्या शिखरावर असताना मीनाक्षी शेषाद्रीने मनोरंजन विश्वाला रामराम म्हणत परदेशी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला (Bollywood Actress Meenakshi Seshadri Birthday Special Story).

झारखंडच्या सिंदरी येथे 16 नोव्हेंबर 1963 रोजी जन्मलेल्या मीनाक्षी शेषाद्रीचे खरे नाव शशिकला शेषाद्री आहे. भरतनाट्यम, कुचीपुडी, कथक आणि ओडिसी या शास्त्रीय नृत्याच्या 4 शैलींचे तिने शास्त्रोक्त शिक्षण घेतले आहे. नृत्यनिपुण असणाऱ्या मीनाक्षी शेषाद्रीने 1981मध्ये ‘इव्ह विकली मिस इंडिया’ हा किताब आपल्या नावे केला. त्यानंतर त्याच वर्षी टोकियोमध्ये पार पडलेल्या ‘मिस इंटरनॅशनल’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

‘या’ चित्रपटाने बनवले स्टार

मीनाक्षी शेषाद्रीने 1983मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पेंटर बाबू’ या चित्रपटापासून आपल्या चित्रपटाच्या कारकीर्दीची सुरूवात केली होती. तिचा हा चित्रपट तिकीट खिडकीवर काही खास जादू दाखवू शकला नव्हता. यानंतर मीनाक्षीने जॅकी श्रॉफबरोबर सुभाष घई यांच्या ‘हिरो’ या चित्रपटात काम केले. ‘हिरो’ चित्रपट प्रचंड गाजला आणि मीनाक्षी रातोरात स्टार बनली (Bollywood Actress Meenakshi Seshadri Birthday Special Story).

‘हिरो’ चित्रपटाच्या यशानंतर मीनाक्षी पुन्हा मागे वळून पाहिले नाही. त्यानंतरच्या कारकीर्दीत मीनाक्षी शेषाद्रीने अनेक उत्तम चित्रपट दिले आणि लोकांच्या हृदयात खास स्थान मिळवले.

कुमार सानूशी अफेअरच्या चर्चा

महेश भट्टच्या ‘जुर्म’ चित्रपटाच्या सेटवर मीनाक्षी आणि कुमार सानू यांची पहिली भेट झाली होती. या चित्रपटातील ‘जाब कोई बात बिघाड जाये’ हे गाणे कुमार सानू यांनी गायले होते. इथून सुरू झालेल्या मैत्रीच्या नात्याने हळूहळू प्रेमाचे वळण घेतले. त्यावेळी कुमार सानू विवाहित असल्याने तब्बल 3 वर्ष हे नाते त्यांनी लपवून ठेवले होते. त्यांच्या पत्नीला कुणकुण लागताच दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर कुमार सानू यांनी मीनाक्षीसह असलेल्या नात्याची कबुली दिली होती. मात्र, काही काळानंतर दोघांच्या नात्याला पूर्णविराम मिळाला (Bollywood Actress Meenakshi Seshadri Birthday Special Story).

चित्रपटक्षेत्राला ‘रामराम’

चित्रपट कारकीर्द बहरत असताना, ऐन यशाच्या शिखरावर असलेल्या मीनाक्षीने चित्रपट सृष्टीला निरोप देण्याचा निर्णय घेतला. 1997मध्ये गुंतवणूक बँकर हरीश म्हैसूरशी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर ती अमेरिकेच्या टेक्सास शहरामध्ये स्थायिक झाली. टेक्सास शहरात मीनाक्षी तिची स्वत:ची नृत्य शाळा देखील चालवते.  2008मध्ये सुरू झालेल्या या नृत्य शाळेचे नाव ‘चॅरीश डान्स स्कूल’ असे आहे. मीनाक्षी शेषाद्रीची नृत्य शाळा टेक्सासमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. अगदी सगळ्या वयाचे लोक या शाळेत नृत्य शिकण्यास येतात.

(Bollywood Actress Meenakshi Seshadri Birthday Special Story)