
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने तिचे नवीन लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. सारा तिच्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

साराने तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करून इंटरनेटचं तापमान वाढवलं आहे. साराचे इन्स्टाग्रामवर 41 मिलियन फॉलोअर्स आहेत.

साराने शिमरी ड्रेसमध्ये हे फोटोशूट केलं असून या फोटोंमध्ये सारा खूप सुंदर दिसत आहे. या फोटोंना 7 लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.

सारा अली खानने हे फोटो शेअर करताना "Olive you so much" असं कप्शन दिलं आहे.

ऑलिव येलो रंगाची शिमर शॉर्ट ट्यूब ड्रेसवर साराने हाई हील्स घातली आहे. तसेच साराने हे फोटोशूट करताना केस मोकळे सोडून त्यांना वेवी स्टाईल दिली आहे. हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने न्यूड मेकअप केला आहे.