बुलंदशहर हिंसेचा मास्टर माईंड पोलिसांच्या ताब्यात

| Updated on: Jul 05, 2019 | 4:54 PM

बुलंदशहर (उत्तर प्रदेश) : बुलंदशहरच्या स्याना पोलिस ठाण्याअंतर्गत येण्याऱ्या एका शेतात गायीचे अवशेष आढळल्याने तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. त्यानंतर संतप्त जमावाने चिंगरावठी चौकीला घेराव घालत पोलिसांवर दगडफेक केली आणि गोळ्या झाडल्या. यामध्ये पोलीस अधिकारी सुबोध कुमार सिंह यांचा मृत्यू झाला. त्यानंतर परिसरात मोठा गोंधळ झाला. ही हिंसा घडवून आणणाऱ्यांचा तपास पोलिसांनी सुरु केला. सोमवारी रात्रीच […]

बुलंदशहर हिंसेचा मास्टर माईंड पोलिसांच्या ताब्यात
Follow us on

बुलंदशहर (उत्तर प्रदेश) : बुलंदशहरच्या स्याना पोलिस ठाण्याअंतर्गत येण्याऱ्या एका शेतात गायीचे अवशेष आढळल्याने तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. त्यानंतर संतप्त जमावाने चिंगरावठी चौकीला घेराव घालत पोलिसांवर दगडफेक केली आणि गोळ्या झाडल्या. यामध्ये पोलीस अधिकारी सुबोध कुमार सिंह यांचा मृत्यू झाला. त्यानंतर परिसरात मोठा गोंधळ झाला.
ही हिंसा घडवून आणणाऱ्यांचा तपास पोलिसांनी सुरु केला. सोमवारी रात्रीच पोलिसांनी या प्रकरणातील तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे, तर 75 लोकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. देवेंद्र, चमन आणि आशीष अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आता ही हिंसा घडवून आणणाऱ्या मुख्य आरोपीचे नावही उघड करण्यात आले आहे. योगेश राज या व्यक्तीवर लोकांना भडकवण्याचा आरोप आहे. तर योगेश राज (जिल्हा अध्यक्ष, प्रवीण तोगडिया ग्रुप), उपेंद्र राघव (बजरंग दल), शिखर अग्रवाल (माजी अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा) या तिघांवर सुबोध कुमार यांच्या मृत्यूचा आरोप आहे.
पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, योगेश राजने आपल्या साथीदारांसोबत मिळून लोकांना भडकवले. सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास जेव्हा हा जमाव पोलीस चौकीवर पोहोचला, तेव्हा पोलीस निरीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांनी लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र लोक शांत व्हायला तयार नव्हते. या दरम्यान काही समाजकंटककांनी सुबोध कुमार सिंह यांची बंदूक आणि मोबाईल फोन हिसकावून घेतला. तसेच वायरलेस सेटही तोडला.
बुलंदशहरात त्या दिवशी नेमकं काय घडलं?
सोमवार ३ डिसेंबरला बुलंदशहरच्या स्याना पोलीस ठाण्याअंतर्गत येण्याऱ्या एका शेतात गायीचे अवशेष आढळले. यावरुन तेथे वाद पेटला. याची माहिती मिळताच सुबोध कुमार सिंह यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. एफआयआर दाखल होत असतानाच तीन गावातून 400च्या जवळपास लोकांचा जमाव ट्रॅक्टरमध्ये गायीचे अवशेष घेऊन येत होता. त्यांनी चिंगरावठी पोलीस ठाण्याला घेराव घातला. यानंतर लोकांनी पोलिसांवरच हल्ला चढवला. या विरोधात जमावावर लाठीचार्ज केला. पण जमावाकडून झालेल्या गोळीबारात सुबोध कुमार सिंह हे जखमी झाले. त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सुबोध कुमार सिंह यांच्या डोक्यात गोळी लागल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला, असे बुलंदशहरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.