बारावीत चार विषय गेले, नावासमोरचं ‘चौकीदार’ हटवलं

कोलकाता : सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झालाय. अनेकांनी भरघोस गुण घेत आदर्श निर्माण करुन दिलाय, तर काहींच्या पदरी निराशा लागली आहे. अनेकांचा प्रवास प्रेरणादायी आहे, तर काहींना चुकांमधून शिकण्याची गरज आहे. असाच एक प्रकार पश्चिम बंगालमध्ये घडलाय. अभिषेक जना या विद्यार्थ्याने बारावीची परीक्षा दिली होती. पण त्याचे एक-दोन नाही, तर तब्बल चार विषय गेले […]

बारावीत चार विषय गेले, नावासमोरचं 'चौकीदार' हटवलं
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

कोलकाता : सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झालाय. अनेकांनी भरघोस गुण घेत आदर्श निर्माण करुन दिलाय, तर काहींच्या पदरी निराशा लागली आहे. अनेकांचा प्रवास प्रेरणादायी आहे, तर काहींना चुकांमधून शिकण्याची गरज आहे. असाच एक प्रकार पश्चिम बंगालमध्ये घडलाय. अभिषेक जना या विद्यार्थ्याने बारावीची परीक्षा दिली होती. पण त्याचे एक-दोन नाही, तर तब्बल चार विषय गेले आहेत.

अभिषेक बंगालचं प्रसिद्ध बाऊल संगीत गातो. हे संगीत बंगालचं पारंपरिक संगीत म्हणून ओळखलं जातं. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्याने 3 मे रोजी एक ट्वीट केलं. मानवसंसाधन मंत्री प्रकाश जावडेकर यांना टॅग करुन त्याने ट्वीट केलं की, “यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी मी प्रचंड मेहनत घेतली होती. पण सीबीएसईने मला पास केलं नाही. मी विनंती करत को माझ्या निकालावर योग्य ती कारवाई करत मला पास करण्यात यावं. माझं करिअर खराब करु नये. मी कोलकात्यात राहतो आणि माझा रोल नंबर 6635011 आहे.”

अभिषेकने ट्वीट केलं तेव्हा त्याच्या नावासमोर ‘चौकीदार’ लिहिलेलं होतं. हे नाव पाहून लोक त्याच्यावर अक्षरशः तुटून पडले. यावर एका चॅनलशी बोलताना तो म्हणाला, मी अगोदर पंतप्रधान मोदींचा चाहता होतो. त्यांना राजकीय गुरु मानत होतो. पण सीबीएसईचा निकाल आला तेव्हा मी नापास झालो. मी चांगला अभ्यास केला होता आणि एवढाही कमकुवत नाही की शून्य गुण मिळतील. मला पूर्ण विश्वास आहे की पंतप्रधान मोदींनी मला मदत केली तर मी पुन्हा पास होईल. मी परीक्षेत प्रचंड मेहनत केली होती आणि माझ्या उत्तरपत्रिका पुन्हा तपासल्यास किमान मी पास होऊ शकतो, असं तो म्हणाला.

“मी आता ना चौकीदार आहे, ना मोदींचा चाहता. मी ट्विटरवर मदत मागताच लोक माझ्यावर तुटून पडले. लोकांनी मला शिव्या देणं सुरु केलं. यामध्ये माझ्यासारखेच चौकीदार लिहिलेले अनेक जण होते. त्यांचं म्हणणं होतं, की तू पास होण्यालायक नाहीस, त्यात मोदीजी काय करतील? मोदींना निवडणुकीत का बदनाम करतोय? हे सर्व 3 मे रोजी झालं आणि 4 मे रोजी मी माझी पोस्ट डिलीट केली. आता तर मी माझं ट्विटर अकाऊंटच डिलीट केलंय. मला हे सर्व अजब वाटलं,” असं अभिषेक म्हणाला.

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.