पद्मश्री पण ज्यांना भेटून धन्य झाला, कोण आहेत पुरस्कार विजेते राजन्ना

के.एस.राजन्ना यांना लहानपणी पोलिओमुळे आपले दोन्ही हात आणि पाय गमवावे लागले होते. पण आपल्या शारीरिक मर्यादांचा उपयोग त्यांनी इतरांच्या सेवेसाठी केला. स्वतःला कोणापेक्षा ही कमी न समजता त्यांनी अपंगांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. राजन्ना यांचा गौरव झाला तेव्हा उपस्थित मान्यवर आणि पाहुणे टाळ्या वाजवत राहिले.

पद्मश्री पण ज्यांना भेटून धन्य झाला, कोण आहेत पुरस्कार विजेते राजन्ना
Follow us
| Updated on: May 10, 2024 | 9:15 PM

Padma Award : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी सामाजिक कार्यकर्ते डॉ केएस राजन्ना यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केला. पोलिओमुळे ज्यांना आपले दोन्ही हात आणि पाय गमवावे लागले होते. हा सन्मान मिळाल्यानंतर राजन्ना म्हणाले की, अपंगांनाही संधी दिली पाहिजे. त्यांना कमकुवत समजू नये. पद्मश्री पुरस्काराच्या वेळी पंतप्रधान मोदींनी त्यांना राजन्ना जी असे संबोधले होते.” मला खूप आनंद होतो की आता अपंग कोणी म्हणत नाही. यामुळे मला आता आदर वाटतो.”

हा सन्मान स्वीकारण्यासाठी जात असताना राजन्ना पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना शुभेच्छा देण्यासाठी गेले. राजन्ना पीएम मोदींचा हात धरून काहीतरी बोलताना दिसले. काही सेकंदांची ही भेट पाहणाऱ्यांना भावूक करत आहे. पीएम मोदींची भेट घेतल्यानंतर राजन्ना राष्ट्रपतींच्या आसनाकडे निघाले तेव्हा त्यांनी डोके टेकवून स्टेजला नमस्कार केला. मंचावर राजन्ना यांनी कपाळाला वाकून नमस्कार केला. राजन्ना यांचा गौरव झाला तेव्हा उपस्थित मान्यवर आणि पाहुणे टाळ्या वाजवत राहिले.

के.एस.राजन्ना यांचे आयुष्य खूप संघर्षमय होते. “पद्मश्री पुरस्काराच्या वेळी पंतप्रधान मोदींनी त्यांना राजन्ना जी असे संबोधले. मला खूप आनंद होतो की आता मला कोणीही अपंग म्हणत नाही, मला दिव्यांग म्हटल्याने त्याचा मला आदर वाटतो, असे राजन्ना यांनी सांगितले.

पद्मश्री मिळालेले राजन्ना कोण आहेत?

राजन्ना यांनी आपले संपूर्ण आयुष्य अपंगांच्या कल्याणासाठी समर्पित केले आहे. त्यांनी केलेल्या या सेवेसाठीच त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 2013 मध्ये कर्नाटक सरकारने त्यांची अपंगांसाठी राज्य आयुक्त म्हणून नियुक्ती केली होती. बालपणी पोलिओमुळे त्यांना दोन्ही हात आणि पाय गमवावे लागले. कर्नाटकातील केएस राजन्ना या यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला.

के.एस.राजन्ना यांना लहानपणी पोलिओमुळे हात आणि पाय गमवावे लागल्यानंतर ते गुडघ्यावर चालायला शिकले. आपल्या शारीरिक मर्यादांचा उपयोग त्यांनी प्रेरणा म्हणून केला. स्वतःला कोणाहूनही कमी न मानून अपंगांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. समाजसेवेत रुजू झाल्यानंतर त्यांनी अविरत काम केले.

या वर्षी २६ जानेवारीला जाहीर झालेल्या पद्म पुरस्कार विजेत्यांच्या यादीत त्यांचे नाव आल्यानंतर राजन्ना म्हणाले होते, “हा पुरस्कार माझ्यासाठी साखर खाण्याइतका गोड आहे. हा मला प्रेरणा देणारा आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या सामाजिक कार्यात आणखी मदत मिळेल. आम्हाला नुसती सहानुभूती हवी नाही, तर हक्क बजावण्याची संधीही हवी आहे.

केएस राजन्ना यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोक त्याच्या धाडसाचे खूप कौतुक करत आहेत. आज पद्मश्री पुरस्कारही अशा महान व्यक्तीला भेटून धन्यता मानतो. हा खरा सन्मान आहे! या व्हिडिओने मला भावूक केले. आणखी एका यूजरने लिहिले की, हा या व्यक्तीचा सन्मान नसून पद्मश्री पुरस्काराचा सन्मान आहे. हा खरा सन्मान आहे.

Non Stop LIVE Update
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.