उल्लासनगरमध्ये भीषण अपघात, ट्रकचालकाने 5 ते 6 दुचाकींना उडवलं; पाहा CCTV व्हीडिओ

| Updated on: Nov 04, 2020 | 8:02 PM

या अपघाताचा सीसीटीव्ही व्हीडिओ समोर आला आहे.

उल्लासनगरमध्ये भीषण अपघात, ट्रकचालकाने 5 ते 6 दुचाकींना उडवलं; पाहा CCTV व्हीडिओ
Follow us on

उल्हासनगर : भीषण अपघाताचे अनेक सीसीटीव्ही तुम्ही पाहिले असतील असाच एक काळजाचा ठोका चुकवणारा सीसीटीव्ही उल्हासनगरमधून समोर आला आहे. एका ट्रक चालकाने थेट 5 ते 6 दुचाकींना उडवलं आहे. चालकाचा ट्रकवरचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे. (CCTV video horrific accident in Ulhasnagar a truck driver crashed 5 to 6 two wheelers)
या अपघाताचा सीसीटीव्ही व्हीडिओ समोर आला आहे. उल्हासनगरच्या 17 सेक्शन परिसरात मोबाईल मार्केटमध्ये ही घटना घडली. दुपारच्या सुमारास एका छोट्याश्या रस्त्यावरून जाताना एका ट्रक चालकाने कडेला उभ्या असलेल्या 5 ते 6 दुचाकींना उडवलं. तुम्ही पाहू शकता या व्हीडिओमध्ये कशा प्रकारे ट्रक चालकाने दुचाकींना उडवलं. यामध्ये पुढे चाललेला दुचाकीस्वार थोडक्यात बचावला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये 3 जण किरकोळ जखमी झाले आहेक. सर्व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.

इतर बातम्या – 

धक्कादायक! अज्ञात व्यक्तीने बस स्थानकाला लावली आग; परिसरातल्या हातगाड्या, सायकलीसुद्धा आगीत फेकल्या

अर्णवच्या पत्नी आणि मुलाविरोधातही गुन्हा दाखल; सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप

(CCTV video horrific accident in Ulhasnagar a truck driver crashed 5 to 6 two wheelers)