महसूलमंत्री पित्याच्या भूमिकेत, पूरग्रस्त कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी मदत करणार

| Updated on: Sep 04, 2019 | 9:21 AM

चंद्रकांत पाटील यांनी यंदाच्या वर्षी ज्या मुलींचे विवाह होणार आहे, अशा सर्व मुलींच्या विवाहासाठी सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे जाहीर केले.

महसूलमंत्री पित्याच्या भूमिकेत, पूरग्रस्त कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी मदत करणार
Follow us on

मुंबई : सांगली कोल्हापूरमध्ये गेल्या महिन्यात पावसाने भीषण पूरस्थिती (Sangli Kolhapur Flood) ओढावली होती. त्यामुळे अनेकांचे कुटुंब संसार उघड्यावर (Sangli Kolhapur Flood) पडले. अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांसोबतच (Maharahtra flood) सर्वस्व गमावलेल्या पालकांसमोर आपल्या मुलींचे विवाह (Girl Marriage) कसे करायचे हा असा प्रश्नही निर्माण झाला आहे. हाच प्रश्न स्थानिक नागरिकांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासोबत माडला. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी यंदाच्या वर्षी ज्या मुलींचे विवाह होणार आहे, अशा सर्व मुलींच्या विवाहासाठी सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे जाहीर केले.

नुकतंच मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे पूरग्रस्त भागातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी एक चर्चा आयोजित करण्यात आली होती. या चर्चेनंतर ते बोलत होते. चंद्रकांत पाटील यांच्या या निर्णयानंतर आर्थिक विवंचनेत सापडलेल्या अनेक माता-पित्यांना दिलासा मिळणार आहे.

कोल्हापूर, सांगलीत सद्यस्थितीत पूर ओसरला असला, तरी संपूर्ण परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे यंदा होणाऱ्या मुलींच्या विवाहासाठी लागेल ती मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या उपक्रमात महाराष्ट्रतील सर्व दानशुर व्यक्तींनी मदत करुन सहभाग घ्यावा असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

मंदिरेही नव्याने बांधणार

सांगली कोल्हापूरसह इतर पूरग्रस्त भागातील क्षतिग्रस्त झालेल्या मंदिरांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण उध्वस्त झालेल्या मंदिरांची आवश्यकता भासल्यास पुनर्बांधणी करणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थानाचे अध्यक्ष महेश जाधव यांनी या मंदिरांचे दुरुस्ती व पुनर्वसन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कुस्ती खेळण्यासाठी बांधलेल्या तालमी सुद्धा या महापुरात उध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे या तालमी भोसरी येथील आमदार महेश लांडगे यांनी पुन्हा उभ्या करून देण्याचा निर्धार केला असल्याची माहिती चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.