पिंपरीत चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट

पुणे: चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. दोन दिवसांपूर्वी ठाण्यातील शहापूरमध्ये स्फोट होऊन अख्खं कुटुंब जखमी झालं होतं. त्यानंतर आता पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्येही चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाला. पिंपरीतील कासारवाडी इथं चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट होऊन घराला आग लागली. या आगीत बिरादार कुटुंबातील 5 जण जखमी आहेत. काय आहे प्रकरण? पिंपरीतील कासारवाडी […]

पिंपरीत चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट
| Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

पुणे: चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. दोन दिवसांपूर्वी ठाण्यातील शहापूरमध्ये स्फोट होऊन अख्खं कुटुंब जखमी झालं होतं. त्यानंतर आता पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्येही चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाला. पिंपरीतील कासारवाडी इथं चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट होऊन घराला आग लागली. या आगीत बिरादार कुटुंबातील 5 जण जखमी आहेत.

काय आहे प्रकरण?

पिंपरीतील कासारवाडी येथील बिरादार कुटुंबातील सदस्याने झोपताना मोबाईल चार्जिंगला लावला होता. रात्रभर मोबाईल चार्जिंग सुरुच होतं.  रात्रभर मोबाईल चार्जिंगला लावून ठेवणं धोक्याचं आहे. त्याचीच प्रचिती  बिरादार कुटुंबाला आली. कुटुंब झोपेत असताना चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाला. सर्वजण झोपेत असल्याने नेमकं काय झालंय कोणालाच कळलं नाही. या स्फोटाने घराला आग लागली. त्यामुळे या आगीत 5 जण जखमी झाले आहेत. जखमींवर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दोन दिवसांपूर्वी शहापूरमध्ये मोबाईल स्फोट

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील शहापूर इथं शाओमी कंपनीच्या मोबाईलचा स्फोट होऊन, घराला आग लागली होती. या आगीत कुटुंबातील सर्व सदस्य जखमी झाले होते. शिवाय घरातील प्रापंचिक साहित्य जळाल्याने लाखोंचं नुकसान झालं होतं.

संबंधित बातम्या 

शाओमीच्या फोनचा स्फोट, घरात आग लागून लाखोंचं नुकसान   

पेट्रोल पंपावर मोबाईलचा स्फोट का होतो? जाणून घ्या