CISF जवानांवर दुजाभाव, खारघरमधील सोसायटीचा अजब फतवा, घर रिकामे करण्यासाठी दबावतंत्र

| Updated on: Jun 09, 2020 | 1:10 PM

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस, डॉक्टर, जवान हे महत्त्वाची भूमिका बजावत (CISF Soldier Navi Mumbai) आहेत.

CISF जवानांवर दुजाभाव, खारघरमधील सोसायटीचा अजब फतवा, घर रिकामे करण्यासाठी दबावतंत्र
Follow us on

नवी मुंबई : देशातील महत्वाच्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या आणि सामान्यांचे संरक्षण करणाऱ्या सीआयएसएफच्या (CISF) जवानांना सिडकोच्या स्वप्नपूर्ती सोसायटीत विरोध केला जात (CISF Soldier Navi Mumbai) आहे. कोरोनाचा संसर्ग वाढण्याचे कारण पुढे करून तब्बल 500 कुटुंबांना यापुढे भाड्याचे घर न देण्याचा फतवा स्वप्नपूर्ती सोसायटीतील काही निवडक सदस्यांनी घेतला असल्याचा आरोप CISF जवानांनी केला (CISF Soldier Navi Mumbai) आहे.

खारघर सेक्टर 36 येथे सिडकोने तब्बल साडेतीन हजार घरांची अल्प उत्पन्न आणि अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी भव्य गृहसंकुल उभारले आहे. या सोसायटीतील वाटप झालेल्या घरांपैकी 60 टक्के खोल्या मालकांनी भाड्याने दिल्या आहेत. यात CISF जवानांच्या कुटुंबांचा अधिक समावेश आहे. सोसायटीत राहणाऱ्या मालकां व्यतिरिक्त या जवानांमुळे सोसायटीत कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, अशी भीती सोसायटीतील काही निवडक लोकांना वाटत आहे.

या गोष्टीवरूनच सध्या राहत असणाऱ्या जावानांचे करार संपल्यानंतर त्यांना तत्काळ बाहेर काढण्याची तसेच CISF च्या जवानांना स्वप्नपूर्ती सोसायटीत नव्याने घर भाड्याने राहण्यास देण्याची परवानगी देऊ नये. तसेच कोरोना काळात CISF जवानांच्या कुटूंबियांना गृहसंकुलात शिफ्ट करू नये, असं पत्रच काही सोसायटीमधील मंडळींनी CISF मुख्यालय, सिडको आणि नवी मुंबई पोलिसांना तसे लेखी पत्र देण्यात आले आहे.

स्वप्नंपूर्तीत राहणारे जवान एअरपोर्ट, ओएनजीसी, मुंबई याठिकाणी कर्तव्य निभावत आहेत. आज CISF जवानांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे आणि अशा बिकट परस्थितीत सोसायटीमधील काही पदाधिकारी जवानांचे मनोबल वाढवण्या ऐवजी खच्चीकरण करत आहे.

सोसायटी अधिकृत व्यक्तींच्या नियंत्रणात नसल्याने येथे आता काही लोकांची मनमानी सुरू आहे. म्हणूनच सुरक्षा करणाऱ्यांनाच बेघर करण्याच्या हालचाली सुरू झाल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

“स्वप्नपूर्ती सोसायटीमध्ये अद्याप अॅडहॉक कमिटी नेमलेलीच नाही. सध्या बँक खाते उघडण्यासाठी प्रवर्तक नेमले आहेत. त्यांना खाते उघडण्यापलीकडे कसलेही अधिकार नाहीत. तसेच इतर कोणालाही सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचे अधिकार प्राप्त झालेले नाहीत. सोसायटीत राहणाऱ्या मालकाच्या घरात कोण भाडोत्री राहील अथवा नाही हा त्या घरमालकाचा अधिकार आहे. या अधिकारात सोसायटी हस्तक्षेप करू शकत नाही”, असं सिडकोचे सहनिबंधक सहकारी सोसायटीचे केदार जाधव यांनी सांगितले.

“कायद्यानुसार एखाद्या जमातीला अथवा एखाद्या ठिकाणी कामाला असणाऱ्या ठराविक लोकांना वास्तव्यास मनाई करणे अपराध आहे. भाडेकरू ठरवण्याचा अधिकार घरमालकाला आहे. भाडेकरू चुकीचे कृत्य करीत असल्यास त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार करू शकता. संपूर्ण समूहाला जबाबदार धरणे गैर आहे”, असं सिटीझन युनिटी फोरोमचे पनवेल अध्यभ अरुण भिसे यांनी सांगितले.

“स्वप्नपूर्ती सोसायटीतील घरांमध्ये स्वतः मालकांव्यतिरिक्त इतर भाडेकरूंनी राहू नये, अशी सिडकोची अट आहे. त्या अटींनुसार आम्ही सोसायटीतील घरे भाड्याने कोणालाही देऊ नका, अशी मागणी केली आहे. सध्या सोसायटीत CISF आणि इतर नागरिक असे दोन हजारांहून अधिक भाडेकरू राहत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने सोसायटीच्या सदस्यांनी एकत्र येऊन घरमालकांनी घरे भाड्याने देऊ नये, असे पत्र आम्ही सिडकोला दिले आहे”, असं स्वप्नपूर्ती सोसायटीचे सदस्य भगवान केशभट यांनी सांगितले.

Exclusive | गृहमंत्री अनिल देशमुखांचा SRPF जवानांशी संवाद, जवानांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न

Maharashtra Corona Update | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 88 हजारांच्या पार