AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दु:खद बातमी ! ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन

राज्याच्या राजकारणातून दु:खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन झाले आहे. त्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी होत्या. मुंबईतील माहिम येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दु:खद बातमी ! ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन
| Updated on: Dec 20, 2025 | 6:00 PM
Share

राज्याच्या राजकारणातून दु:खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन झाले आहे. त्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी होत्या. मुंबईतील माहिम येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शालिनीताई पाटील या 94 वर्षाच्या होत्या, गेल्या काही काळापासून त्या आजारी होत्या. आता वृधापकाळाने त्यांच निधन झालं आहे.

शालिनीताई पाटील यांचे निधन

शालिनीताई पाटील या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी होत्या. त्या गेल्या काही काळापासून आजारी होत्या. आज त्यांनी मुंबईत माहिम येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील मूळ गावी त्यांच्यावर अंत्य संस्कार केले जाणार आहे. त्यांच्या निधनाने कांग्रेसवर शोककळा पोहोचली आहे. शालिनीताई यांनी वसंतदादांना खबीर साथ दिली होती. मात्र आता त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे.

 महाराष्ट्राच्या राजकारणातील वाघीण

शालिनीताई पाटील या मंत्री आणि आमदार म्हणून एक सक्षम लोकप्रतिनिधी म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांनी मराठा आरक्षणासाठीही आवाज उठवला होता, मात्र त्यांना नेत्यांची आणि जनतेची साथ मिळाली नव्हती. साताऱ्याचे उदयनराजे भोसले यांनी शालिनीताईंना मातेसमान दर्जा देत सदैव साथ दिली. शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी शालिनीताईंचा उल्लेख महाराष्ट्राच्या राजकारणातील वाघीण असा केला होता. शालिनीताई या ए.आर अंतुलेच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या महसूलमंत्री होत्या.

दोघांचेही दुसरे लग्न

शालिनीताई आणि वसंतदादा यांनी एकमेकांसोबत दुसरे आपले दुसरे लग्न केले होते. शालिनीताईंचे पहिले लग्न एका विद्ववान न्यायाधीशासोबत झाले होतेस मात्र लग्नानंतर काही कालावधी उलटल्यानंतर त्यांचे निधन झाले. ताई ऐन तारूण्यात विधवा व एकाकी झाल्या. ताई त्या काळात बॅरिस्टर झाल्या. त्यांना मुंबई मंत्रालयात नोकरी मिळाली. मुख्यमंत्री वसंतदादांच्या त्या पीए झाल्या. वसंत दादांच्या पहिल्या पत्नी आजारी असायच्या. त्यामुळे शालिनीताईंसोबत लग्न करण्याचा विचार वसंतदादांच्या मनात आला. त्यानंतर या दोघांचे लग्न मुंबईत पार पडले. या विवाहाला मर्यादित लोक उपस्थित होते. यावरून दोघांनाही टीकेचा सामना करावा लागला. मात्र दोघांनीही याकडे दुर्लक्ष करत जनतेची सेवा सुरू ठेवली.

Follow Us
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं
tv9 Marathi Special Report | सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं? संपूर्ण व्हिडिओ बघाच
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर पुढे काय होणार?
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...