मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; म्हणाले, पुढील दोन महिन्यात…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना यांना मोठा दिलासा दिलाय. त्यांनी उर्वरित शेतकऱ्यांना पुढील एक-दोन महिन्यात पैसे मिळतील, अशी माहिती दिली आहे.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने काही दिवसांपूर्वीच राज्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली आहे. सरकारने काल 6 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले. त्यानंतर इतर शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील एक ते दोन महिन्यात कर्जमाफीचे पैसे जमा होतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते सांगलीत बोलत होते.
माजी मंत्री डॉ. अण्णासाहेब डांगे यांच्या 91 व्या वाढदिवसानिमित्त सांगलीच्या आष्टा येथे नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली. यावेळी कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना पुढील दोन महिन्यात लाभ मिळेल, असे स्पष्ट केले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘ अण्णासाहेब डांगे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत त्यांची नाळ आजही कायम आहे. त्यांनी एक पुस्तक लिहिलं, त्यात संघात कसं कार्य केलं. त्यामुळे जीवनात कसा बदल झाला, याविषयी माहिती दिली. खरंतर महाराष्ट्रातील चांगल्या वक्त्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. माईक नसताना त्यांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचायचा. ते एक फर्डे वक्त आहेत. अण्णा त्यांच्या भाषणात अनेक किस्से सांगायते. त्यावरही एक पुस्तक लिहिलं गेलं आहे. ते भाषणातून न बोलता शालजोडीत फटके कसे देतात, हे त्यांच्याकडून शिकता येते’.
‘आज त्यांचा जन्मदिवस देखील आहे. हा कार्यक्रम ठरला, त्यावेळी ठरवलं की, महाराष्ट्रात 1980 साली कर्जमाफी लढा सुरू झाला होता. शरद जोशी हे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून लढा उभारत होते. तर हा लढा डांगे यांनी सर्वप्रथम राजकीय केला. तळागाळात जायचं असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, असे त्यांनी सांगितले होते. भाजपने ते स्वीकारलं. काही जणांनी त्यावेळी म्हटलं की, शरद जोशींनी लढा हाती घेतला आहे. तर आपण का करायचं, परंतु भाजपने डांगेंचं ऐकलं. त्यानंतर भाजपने शेतकऱ्यांसाठी विधानसभेवर मोर्चे काढले. त्यातून कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आला. डांगे यांना जन्मदिवशी गिफ्ट म्हणून इथे यायच्या आधी ५६ शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. काल ६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले. सरकार पुढच्या एक किंवा दोन महिन्यात सर्वांच्या खात्यात पैसे जमा करणार आहे. जे प्रामाणिकपणे कर्ज भरतात, त्यांच्याही खात्यात 50 हजार जमा करणार आहे. सरकारने या मार्गातून कर्जमाफीचे काम करून दाखवलं आहे, असे त्यांनी पुढे सांगितलं.