मोठी बातमी! शी जिनपिंग दौऱ्यावर असतानाच भारताचा अमेरिकेला सर्वात मोठा दणका, डोनाल्ड ट्रम्प हात चोळत बसले
चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचं अमेरिकेमध्ये भव्य स्वागत करण्यात आलं आहे. परंतु दुसरीकडे चीनचे राष्ट्रपती अमेरिकेच्या दौऱ्यावर असतानाच भारताने ट्रम्प यांना मोठा दणका दिला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. हे युद्ध थांबावं यासाठी अमेरिकेनं मध्यस्थी केली. मात्र हे युद्ध थांबवण्यात डोनाल्ड ट्रम्प यांना यश आलं नाही. त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियावर निर्बंध घातले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी केवळ रशियावरच निर्बंध घातले नाहीत तर जे देश रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करतील त्या देशांवर आपण शंभर टक्के टॅरिफ लावू अशी धमकी देखील ट्रम्प यांच्याकडून देण्यात आली आहे. भारत आणि चीन हे दोन मोठे देश रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात करतात. दरम्यान ट्रम्प यांनी दिलेल्या धमकीनंतर चीन आणि भारत काय भूमिका घेणार? याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं. मात्र भारताने या आधीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही आमचं धोरणं स्वत: ठरवू , आम्हाला जिथून स्वस्त कच्चं तेल मिळेल तिथून ते आम्ही खरेदी करू, आमचं पहिलं प्राधान्य हे देश हिताला असेल असं भारताने अमेरिकेला ठणकावलं होतं.
दरम्यान सध्या चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. शी जिनपिंग हे अमेरिकेच्या दौऱ्यावर असतानाच भारताने अमेरिकेला एक मोठा धक्का दिला आहे. तो म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफची धमकी दिली असताना देखील भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरूच ठेवली आहे. जेवढं कच्चं तेल भारताने रशियाकडून ऑगस्टमध्ये खरेदी केलं होतं, तेवढंच सप्टेंबरमध्ये देखील खरेदी केलं आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबर महिन्यात भारताने प्रति दिवस रशियाकडून तब्बल 18 लाख बॅरल तेलाची खरेदी केली आहे. जुलै महिन्याच्या तुलनेत जरी ही खरेदी कमी असली तर देखील सध्या भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची खरेदी करत आहे.
भारत आणि चीन सारखे देश रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची खरेदी करतात. यातून मिळालेले पैसे रशिया युक्रेनविरोधात युद्धात वापरत असल्याचा आरोप अमेरिकेकडून करण्यात येत आहे. त्यामुळेच जे देश रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करतील त्यांच्यावर आम्ही शंभर टक्के टॅरिफ लावू अशी धमकी अमेरिकेकडून देण्यात आली आहे. मात्र अमेरिकेच्या धमकीनंतर देखील भारताने रशियाकडून तेलाची खरेदी सुरूच ठेवली आहे.
