मला नरकात जायचे नाही, मी धार्मिक व्यक्ती; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान चर्चेत
सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांना स्वर्गात जायचे आहे, नरकात नाही असे म्हटले. त्यांचे हे विधान सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे कायमच त्यांच्या वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतात. अलीकडे त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीची जोरदार चर्चेचा सुरु आहे. सीबीएसच्या ‘६० मिनिट्स’ शोमध्ये पत्रकार रॉस डौथॅट यांनी त्यांना जीवन आणि मृत्यूबद्दल प्रश्न विचारला होता.त्यावर उत्तर देताना डोनाल्ट ट्रम्प म्हणाले की, त्यांना नरकात जायचे नाही. ते एक धार्मिक व्यक्ती आहेत, त्यामुळे त्यांना आशा आहे की ते स्वर्गातच जातील.
राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अमेरिकेत त्यांचा पक्ष रिपब्लिकनच्या अनेक नेत्यांवर प्राणघातक हल्ले झाले. रविवारी झालेल्या या मुलाखतीदरम्यान पत्रकाराने ट्रम्पना विचारले की, या प्राणघातक हल्ल्यांतून बचावल्यानंतर आपला मृत्यूबद्दलच्या दृष्टिकोनात काही बदल झाला आहे का? त्यावर त्यांनी थेट प्रश्न विचारला की, तुमच्या मते मृत्यूनंतर काय होते? यावर राष्ट्रपती ट्रम्प थोडा विचार करून म्हणाले की, बरं, मला आशा आहे की लोक मला आठवतील. डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले की, मी एक धार्मिक व्यक्ती आहे, त्यामुळे तत्त्वानुसार मला स्वर्गात जायला हवे. मला हीच आशा आहे. मला नरकात जायची इच्छा नाही.
‘मी माझ्या काही शत्रूंचा द्वेष करतो आणि नेहमी करत राहीन’
मुलाखतीदरम्यान पत्रकाराने यापुढे ट्रम्पना एक मनोरंजक प्रश्न विचारला. विचारले की, जर तुम्ही स्वर्गात गेलात तर तुम्ही आपल्या विरोधकांना माफ करू शकाल का? पत्रकाराने विचारले की, समजा तुमचा मृत्यू झाला आणि तुम्ही पुढच्या जन्मात प्रवेश करणार आहात. स्वर्गात जाण्यासाठी तुम्हाला फक्त इतकेच करायचे आहे की, तुम्ही जेम्स कॉमी, नॅन्सी पेलोसी आणि गेल्या काही वर्षांत ज्यांच्याबद्दल तुम्ही द्वेष बाळगला आहे त्या सर्व लोकांसाठी तुमच्या मनात प्रेम आणि क्षमेची भावना ठेवा. तुम्हाला वाटते का की तुम्ही असे करू शकाल? यावर ट्रम्प यांनी उत्तर दिले की, याचे उत्तर आहे- नाही. मी प्रामाणिकपणे सांगतो, नाही. मी कदाचित असे करू शकणार नाही, कारण मी माझ्या काही शत्रूंचा द्वेष करतो आणि नेहमी करत राहीन.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, त्यांना सर्वाधिक विचारले जाणारे प्रश्नांमध्ये यूएफओ (अनआइडेंटिफाइड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स) संबंधी प्रश्नही समाविष्ट आहेत. त्यांनी म्हटले की, आपल्या पहिल्या आणि दुसऱ्या कार्यकाळात त्यांची वायुसेनेच्या अनेक अनुभवी पायलटांशी भेट झाली होती. या पायलटनी त्यांना यूएफओबाबत काही अशा गोष्टी आणि कथा सांगितल्या, ज्या ऐकून ते आश्चर्यचकित झाले. ट्रम्प यांच्या मते, हे सर्व पायलट अत्यंत विश्वासार्ह आणि अनुभवी होते. ते असे लोक नव्हते, जे कोणत्याही आधाराशिवाय कट कथांवर विश्वास ठेवतात.
