Nana Patekar : नाना पाटेकर आणि तनुश्रीचं अफेअर होतं, तिला वाटायचं की…प्रसिद्ध निर्मात्याचा धक्कादायक दावा, काय म्हणाला?
Producer On Nana Patekar : नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांच्याबद्दल एका निर्मात्याने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेल्या अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. ही घटना १० वर्षांपूर्वी घडली होती. तनुश्रीच्या म्हणण्यानुसार, ‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर नाना पाटेकर यांनी तिच्याशी गैरवर्तन केलं होतं. नाना पाटेकर यांना एका गाण्यात तिच्यासोबत रोमँटिक सीन करायचे होते. तनुश्रीनं सांगितलेलं की, तो डान्स मुळात तनुश्री आणि दुसऱ्या एका अभिनेत्यामध्ये होणार होता, तरीही नानांना तिच्यासोबत जवळीक साधणारी कोरिओग्राफी करायची होती. तनुश्रीनं आरोप केला की, त्यांच्या या वागण्यामुळे तिला अस्वस्थ वाटलं आणि तिने त्यावेळी यावर आक्षेप घेतला होता. मात्र, नानांनी हे आरोप फेटाळून लावले. अशातच आता प्रसिद्ध निर्माते मेहमूद अली यांनी तनुश्री आणि नाना पाटेकर यांच्या प्रकरणावर भाष्य केलं आहे.
निर्मात्याचं नाना पाटेकर यांच्याबद्दल वक्तव्य
पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत मेहमूद अली म्हणाले की, ”चॉकलेट‘ सिनेमाच्या सेटवर विवेक तनुश्रीला काहीतरी बोलले होते. त्याचा तिनं पराचा कावळा केला. ‘मी सेटवर येणार नाही‘ असं ती म्हणत होती. सगळे सेटवर तयार होते आणि तनुश्री व्हॅनिटीमध्ये रडत होती.’
मेहमूद पुढे म्हणाले की, ‘तनुश्री कशी आहे, हे मला चांगलंच माहितीये, त्यामुळे मी तिला दोष देईन. तनुश्री आणि नाना पाटेकर यांच्यात ‘हॉर्न ओके‘च्या सेटवर काय झालेलं, हे मला माहित आहे. त्या संपूर्ण घटनेत नाना पाटेकर यांचा काहीच दोष नव्हता. तनुश्री आणि नाना पाटेकर यांचं काही दिवसांपूर्वी भांडण झालेलं. त्यांचं अफेअर होतं, ते एका रिलेशनशिपमध्ये होते. तनुश्रीला वाटायचं की, ती नानांकडून काहीतरी शिकेल, त्याचवेळी त्यांचं भांडण झालं.’
‘नाना पाटेकर यांनीच तनुश्रीला पाहुणी कलाकार म्हणून घ्यायला सांगितलेलं. नाना पाटेकर यांच्या निधनानंतरही तनुश्री असं वागेल, वाटलं नव्हतं. तनुश्रीनं केलेल्या आरोपांचं नानांना खूप वाईट वाटायचं, याबद्दल त्यांनी सांगितलंही होतं.’ असं मेहमूद पुढे म्हणाले.
