AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या सोप्या ट्रिक्स वापरा… साप कधीच घराभोवती फिरकणार नाहीत, पाहताच थराथरा…

घरासमोर किंवा अंगणात साप येणे चिंताजनक असते. सापांना लपण्यासाठी सुरक्षित जागा व अन्न मिळते तिथे ते येतात. गवत व झुडपांची नियमित छाटणी, भंगार न ठेवणे, रोपट्यांना मर्यादित पाणी देणे आणि लिंबाचा रस किंवा झेंडूची फुले यांसारखे नैसर्गिक उपाय वापरून सापांना घरापासून दूर ठेवता येते. यामुळे तुमच्या कुटुंबाची सुरक्षितता सुनिश्चित होते.

या सोप्या ट्रिक्स वापरा... साप कधीच घराभोवती फिरकणार नाहीत, पाहताच थराथरा...
snakeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 09, 2026 | 12:53 PM
Share

घरासमोर अंगण असणं किंवा एखादा सुंदर बगीचा असणं अत्यंत चांगलं असतं. त्यामुळे मन मोहून जातं. अंगणात रोपटी लावून हिरवाई तयार करणं अनेकांना आवडतं. पण अनेकदा काही छोट्या चुकांमुळे साप घराच्या आसपास येऊ शकतात. कधी कधी तर सापांचा थेट घरातच प्रवेश होतो. खायला आणि लपायला मिळेल अशा सुरक्षित जागांच्या शोधात साप असतात. त्यामुळेच बहुतेक साप झाडाझुडूपांमध्ये सापडतात. जर तुमच्या घराच्या आसपास साप निघत असतील किंवा दिसत असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. काही सोप्या ट्रिक्समुळे तुम्ही जीवावरचं संकट टाळू शकता.

झाडंझुडपं वाढू देऊ नका

साप लपण्यासाठी गवत आणि गर्द झाडाझुडपांचा आधार घेत असतो. त्यांच्यासाठी त्या जागा सुरक्षित असतात. अशा ठिकाणी त्यांना ऊन आणि शिकार दोन्ही गोष्टी सहज मिळतात. त्यामुळे बगिच्यातील गवत, झुडपांची वेळोवेळी छाटनी केली पाहिजे. त्यामुळे सापांना लपण्यासाठी जागा मिळणार नाही.

भंगार वाढवू नका

अनेक लोक घराच्या आजूबाजूला भंगार ठेवत असतात. लाकडांचा ढीग, जुन्या गाद्या, तुटलेले जार, भांडी आणि इतर वायफळ सामान घराच्या बाजूला फेकून दिलेलं असतं. या जागा सापांचा अड्डा असतात. तिथे त्यांना सुरक्षितता मिळते. त्यामुळे घराच्या आसपास विनाकारण भंगार ठेवू नका. एक तर ते विकून टाका किंवा कचऱ्यात फेकून द्या.

रोपट्यांना पाणी देऊ नका

घरासमोरील बगिच्यातील रोपट्यांना ज्यादा पाणी देऊ नका. त्यामुळे जमीन ओलसर आणि भुसभुशीत होते. त्यामुळे कीडे आणि जीवजंतू तयार होतात. ज्या ठिकाणी ओलसर जमीन असेल आणि कीडे व इतर जीवजंतू असतात तिथे साप लवकर आकर्षित होतात. त्यामुळे रोपट्यांना गरजेपेक्षा अधिक पाणी देऊ नका. जेवढं आवश्यक तेवढंच पाणी द्या.

असं ठेवा सापाला दूर

आपल्या घरापासून सापांना दूर ठेवण्यासाठी अंगणात पाणी आणि व्हिनेगर समान मात्रेत शिंपडा. अनेक लोक लिंबाचा रस, पुदीन्याचं तेल आणि तिखट मिर्ची एकत्र करून अंगणात तसेच बगिच्यात फेकतात. त्याशिवाय बगिच्यात झेंडूचं फूल, लेमनग्रास आणि सिट्रोनेला सारखी रोपटी लावा. याच्या उग्र दर्पापासून जीवजंतू दूर राहतात. सापही या उग्र दर्पाकडे फिरकत नाहीत.

Follow Us
कोल्हापुरात सतेज पाटलांचा एल्गार! गोकुळ दूध संघाच्या संघर्षविरोधात...
कोल्हापुरात सतेज पाटलांचा एल्गार! गोकुळ दूध संघाच्या कथित गैरव्यवहाराविरोधात संघर्ष मोर्चा, म्हशींसह रस्त्यावर उतरले आंदोलक
सतेज पाटील यांचा कोल्हापुरात संघर्ष मोर्चा; वातावरण तापलं, व्हिडिओ बघा
Gokul : सतेज पाटील यांचा कोल्हापुरात संघर्ष मोर्चा; वातावरण तापलं, व्हिडिओ बघा
गोकुळच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; काळे झेंडे, म्हशी..
Gokul Protest : गोकुळच्या मुद्द्यावरून कोल्हापुरात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; काळे झेंडे, म्हशी अन् पारंपरिक साहित्य घेऊन रस्त्यावर
गोकुळच्या संघर्ष मोर्चाला वकिलांचाही पाठिंबा! अनेक वकील....
Gokul : गोकुळच्या संघर्ष मोर्चाला वकिलांचाही पाठिंबा! कोल्हापुरातील अनेक वकील थेट रस्त्यावर; सरकारी हस्तक्षेपाविरोधात एकजुटीने सहभाग
गोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात रणकंदन; 10 फुटी कोल्हापुरी....
Gokul Protest : गोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात रणकंदन; 10 फुटी कोल्हापुरी पायताण, यमराजाची वेशभूषा अन्..., सतेज पाटलांच्या मोर्चाची राज्यभर चर्चा
रस्त्यावरची लढाई लढणार सतेज पाटील यांचा थेट इशारा...
Gokul : रस्त्यावरची लढाई लढणार सतेज पाटील यांचा थेट इशारा
राज्याच्या राजकारणात काय घडतंय, गंमत बघायची; राऊतांचं सूचक विधान....
Sanjay Raut : राज्याच्या राजकारणात काय घडतंय, त्याची गंमत बघायची; संजय राऊतांचं सूचक विधान, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
गोकुळमध्ये आतापर्यंत काय घडलं? VIDEO बघाच...
Gokul : गोकुळमध्ये आतापर्यंत काय घडलं? VIDEO बघाच...
उद्धव ठाकरे आज सिल्व्हर ओकवर; शरद पवारांची घेणार भेट, राष्ट्रवादीच्या
Uddhav Thackeray Meets Sharad Pawar : उद्धव ठाकरे आज सिल्व्हर ओकवर; शरद पवारांची घेणार भेट, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरही चर्चा होणार?
दिवाळीच्या फटाक्यांचा लोकलला फटका, विरार-नालासोपाऱ्यादरम्यान सिग्नल...
Western Railway : दिवाळीच्या फटाक्यांचा लोकलला फटका, विरार-नालासोपाऱ्यादरम्यान सिग्नल यंत्रणा ठप्प; लोकल 15 ते 30 मिनिटे उशिराने