AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर? रक्कम आज मिळणार की उद्या? सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा

Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme: शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेत तांत्रिक अडचण आली आहे. यामुळे लागलीच कर्जमाफी मिळेल

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर? रक्कम आज मिळणार की उद्या? सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
शेतकरी कर्जमाफी
| Updated on: Aug 05, 2026 | 3:21 PM
Share

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेतंर्गत पहिल्या तीन यांद्यामध्ये प्रमाणीकरण झालेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल. त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. पण तांत्रिक अडचण असल्याने काही शेतकर्‍यांच्या खात्यात आज तर उद्या काही शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा होतील. सहकारी मंत्री बाबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली आहे. आता कर्जमाफी योजनेला विलंब होणार नाही. तांत्रिक कारण असले तरी आज आणि उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होईल.

आज अथवा उद्या खात्यात पैसे येणार

शेतकऱ्यांना कर्जमाफीचे पैसे आज किंवा उद्या मिळतील. पहिल्या टप्प्यात 11 लाख 46 हजार शेतकऱ्यांना मदत मिळेल तर दुसऱ्या टप्प्यात 13 लाख शेतकऱ्यांना मदत मिळेल अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. आतापर्यंत 11 लाख 46 हजार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेले आहे. आज आम्हाला शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करायचे होते. पण काही तांत्रिक अडचण आली आहे. पैसे आजही जमा होऊ शकतात अथवा उद्याही जमा होऊ शकतात, असे बाबासाहेब पाटील म्हणाले.

आतापर्यंत 17 लाखांहून अधिक पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. या याद्या स्थानिक पातळीवर प्रसिद्ध केल्यानंतर रक्कमेची पडताळणी करावी आणि सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे आवाहन सहकार विभागाने केले आहे. पात्र 11 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम थेट हस्तांतरीत करण्यात येणार आहे. डीबीटी द्वारे ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. तांत्रिक अडचणीमुळे रक्कम जमा करण्यास विलंब होत आहे. ही अडचण दूर करण्याचे काम सुरू आहे. येत्या दोन दिवसात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल असे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे.

7,000 कोटी जमा होणार

सहकार विभागाच्या माहितीनुसार, शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत पात्र 16.94 लाख शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात 7000 कोटी रुपये जमा होतील. ही रक्कम काल जमा होणे अपेक्षित होते. पण काही तांत्रिक बाबींमुळे आज अथवा उद्या ही रक्कम पात्र आणि आधार प्रमाणीकरण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. जुनं कर्ज फिटल्याने शेतकरी नवीन पीक कर्ज घेऊ शकतील. 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 7,000 कोटी रुपये डीबीटी प्रणालीद्वारे जमा होतील. राज्यातील एकूण 56 लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होईल. जुन्या कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांनाही या कर्जमुक्तीचा फायदा होईल.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी