30 जूननंतर लॉकडाऊन उठणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

| Updated on: Jun 28, 2020 | 2:43 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (28 जून) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला (CM Uddhav Thackeray conversate with citizens).

30 जूननंतर लॉकडाऊन उठणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (28 जून) महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला (CM Uddhav Thackeray conversate with citizens). यावेळी त्यांनी सध्याचा लॉकडाऊन 30 जूननंतर उठणार नसल्याचं स्पष्ट केलं. तसेच हा लॉकडाऊन आहे तसा न राहता टप्प्याटप्प्याने यात काही सवलती दिल्या जातील, असंही नमूद केलं. कोकणातील परिस्थितीसह राज्यातील अनलॉकबाबत आणि कोरोना नियंत्रणावरही त्यांनी भाष्य केलं.

उद्धव ठाकरे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लागू केलेला लॉकडाऊन 30 जूनला संपत आहे. त्यापुढे काय होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. हा लॉकडाऊन 30 जूननंतर उठणार नाही. मात्र, परिस्थिती आहे तशीही राहणार नाही. सध्या राज्यभरात अनलॉकची प्रक्रिया सुरु आहे. टप्प्याटप्प्याने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी काही गोष्टी सुरु केल्या जात आहेत. आजपासून राज्यभरातील सलून दुकानंही सुरु करण्याची सूट देण्यात आली आहे. मात्र, याचा अर्थ संकट टळलं असा नाही. नागरिकांनी खबरदारी घ्यावी.”

“सर्वधर्मियांनी आपले उत्सव घरात साजरे केले, यासाठी त्या सर्वांचे आभार. आषाढी एकादशीची वारीही संकटात आली. मात्र, वारकऱ्यांनी संयम दाखवला. यासाठी त्यांचेही आभार. मी विठूरायाला कोरोना संकट संपवण्याचं साकडं घालायला जाणार आहे,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

1 जुलै हा राष्ट्रीय डॉक्टर दिवस, कोविड योद्ध्यांना नमन

उद्धव ठाकरे यांनी 1 जुलैच्या निमित्ताने कोरोना नियंत्रणासाठी अहोरात्र काम करणाऱ्या डॉक्टरांनाही नमन केलं. ते म्हणाले, “आधी कोरोना, नंतर निसर्ग चक्रीवादळ आलं. त्याची भीषणता अधिक होती. मात्र शासनाने चांगले काम केले. मनुष्यहानी कमी करण्याचे प्रयत्न केले. आर्थिक नुकसान अतोनात झाले. 1 जुलै हा राष्ट्रीय डॉक्टर दिवस आहे. यानिमित्ताने कोविड योद्ध्यांना नमन करतो. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचाही त्या दिवशी जन्मदिन असल्याने शेतकरी दिवस म्हणूनही हा दिवस साजरा करतो.”

बोगस बियाणे प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करणार

“आजपासून नाभिकांची सेवा सुरु झाली आहे. 30 जूननंतर आणखी काही सेवा सुरु होणार आहेत. मात्र, बिनधास्त वावरु नका. बोगस बियाणांच्या तक्रारी ग्रामीण भागातून येत आहेत. बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट आलं आहे. त्यामुळे यातील आरोपींना शिक्षा करु आणि शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मिळवून देऊ,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

वारकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून पंढरीला जाणार

उद्धव ठाकरे म्हणाले, “मुख्यमंत्री या नात्याने नाही, तर तुमचा, वारकरी बांधवांचा प्रतिनिधी म्हणून पंढरपूरला जाणार आहे. यावेळी मी विठूरायाकडे या कोरोना संकटाचा नष्ट करण्याचं आणि आरोग्यदायी समाजासाठी साकडं घालणार आहे.”

“दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, ईद, माउंट मेरीची जत्रा असे उत्सव येणार आहेत. गोविंदा आणि गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक भान राखण्याचा दाखवलेला निर्णय कौतुकास्पद आहे. गणपतीचं आगमन आणि विसर्जन मिरवणूक होणार नाही. गणेश मूर्तीची उंची जास्तीत जास्त चार फूट असेल. सर्व गणेश मंडळांनी या सूचना मान्य केल्या आहेत. त्याचे मी आभार मानतो,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळी त्यांनी महाराष्ट्र प्लाझ्मा थेरपीचा सर्वाधिक वापर करणारे पहिले राज्य ठरेल, अशीही माहिती दिली. तसेच कोरोनातून बरे झालेल्या नागरिकांना पुढे येऊन प्लाझ्मा दान करावे, असं आवाहन केलं.

केंद्राकडून औषधांना परवानगी घ्यावी लागते. असं असलं तरी रेमडेसीवीर सारखी औषधे उपलब्ध करुन देऊ. या औषधांचा तुटवडा भासू देणार नाही. ही औषधे शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयात मोफत उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असं आश्वासन त्यांनी दिलं.

मुख्यमंत्र्यांच्या संवादातील महत्त्वाचे मुद्दे:

  • 16 हजार कोटींचे सामंजस्य करार परदेशी कंपन्यांसोबत महाराष्ट्राने केले, त्यांच्यासाठी दारे खुली, अर्थचक्र आणि भूमिपुत्रांना रोजगार सुरु राहिले पाहिजे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • डेंग्यू-मलेरिया सारखे आजार पावसाळ्यात पसरतात, आपला परिसर स्वच्छ ठेवा, टायर, नारळाच्या करवंट्या, अंड्याचे कवच, झाडे यात पाणी साचून डेंग्यूचा फैलाव, गरज नसताना बाहेर पडून स्वतः कोविडला बळी पडू नका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • कोरोनाच्या काळातही 16 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यात यशस्वी : उद्धव ठाकरे
  • प्रधानमंत्री गरीब योजनेतून धान्य देण्याची मुदत 30 जूनला संपते आहे, पंतप्रधानांकडे आणखी 3 महिने धान्य देण्यासाठी मुदतवाढ मागितली : उद्धव ठाकरे
  • पाऊस नव्या अंकुरांसोबत, आनंदासोबतच काही संकटंही घेऊन येतो. त्यामुळे साथीच्या रोगाविषयी खबरदारी घ्या : उद्धव ठाकरे
  • पीपीई किट आणि मास्क यांचा मुबलक साठा, चेस द व्हायरस ही मुंबईत राबवलेली संकल्पना महाराष्ट्रभरात सुरु करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • केंद्राकडून औषधांना परवानगी, रेमडेसीवीर सारखी औषधे उपलब्ध करुन देणार, तुटवडा भासू देणार नाही, ही औषधे शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयात मोफत उपलब्ध करण्याचा प्रयत्न असेल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • मुंबईत चेस द व्हायरस संकल्पना राबवली, आता राज्यात अंमलबजावणी : उद्धव ठाकरे
  • प्लाझ्मा थेरपीचा सर्वाधिक वापर करणारे पहिले राज्य कदाचित महाराष्ट्र ठरेल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • आगमन आणि विसर्जन मिरवणूक नाही, गणेश मूर्तीची उंची जास्तीत जास्त चार फूट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, ईद, माउंट मेरीची जत्रा येणार, गोविंदा आणि गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक भान राखण्याचा दाखवलेला निर्णय कौतुकास्पद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • सर्व गणपती मंडळांनी सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दिला, त्यांचेही आभार : उद्धव ठाकरे
  • विठूरायाला कोरोनाचं संकट संपवण्यासाठी आणि आरोग्यदायी आयुष्य मागण्यासाठी साकडं घालणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • मुख्यमंत्री या नात्याने नाही, तर तुमचा, वारकरी बांधवांचा प्रतिनिधी म्हणून पंढरपूरला जाणार आहे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • बोगस बियाण्याच्या तक्रारी ग्रामीण भागातून येत आहेत, त्यामुळे दुबार पेरणीचे संकट, शेतकरी बांधवांना नुकसानभरपाई मिळवून देणार, आरोपींना शिक्षा करणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • आजपासून नाभिकांची सेवा सुरु, 30 तारखेनंतर आणखी काही सेवा सुरु होणार, मात्र बिनधास्त वावरु नका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • एक जुलै हा राष्ट्रीय डॉक्टर दिवस, कोविड योद्ध्यांना नमन, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिन असल्याने शेतकरी दिवस म्हणून साजरा करतो : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • आधी कोरोना, नंतर निसर्ग चक्रीवादळ, त्याची भीषणता अधिक होती, मात्र शासनाने चांगले काम केले, मनुष्यहानी कमी करण्याचे प्रयत्न, आर्थिक नुकसान अतोनात : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • सर्वधर्मियांनी आपले उत्सव घरात साजरे केले, यासाठी आभार, आषाढी एकादशीची वारीही संकटात, मात्र वारकऱ्यांनी संयम दाखवला, यासाठी आभार, मी विठूरायाला साकडे घालायला जाणार आहे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • सर्वधर्मीय बांधवांना माझे धन्यवाद. सर्वांनी आपले सण सामाजिक भान ठेऊन साजरे केले : उद्धव ठाकरे
  • राज्यात शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या तक्रारी आहेत. दोषींवर कठोर कारवाई करणार आणि नुकसान भरपाई मिळवून देणार : उद्धव ठाकरे
  • राज्यभरात लॉकडाऊन असताना आपण घरात बंद असलो तरी शेतकरी आपल्यासाठी उन्हात राबत आहे.
  • आपण कात्रीत सापडलो आहोत. संकटाचा धोका कायम आहे म्हणून टप्प्याटप्प्याने काम सुरु आहे.
  • राज्यात काही प्रमाणात दुकानं सुरु आहेत, सलून देखील सुरु झाले आहेत. मात्र, संकट टळलेलं नाही.
  • हा लॉकडाऊन 30 जूनपर्यंत आहे. यापुढे लॉकडाऊन उठणार नाही. मात्र, परिस्थिती आहे तशीही राहणार नाही.
  • शेतकऱ्यांना आणि डॉक्टरांना माझं अभिवादन.
  • कोकणातील वादळाने मोठं नुकसान झालं, मात्र यंत्रणांनी चोख काम केलं.
  • जवळपास एक महिन्याने आपण भेटतो आहोत, बोलतो आहोत.


दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी याआधी केंद्रीय आरोग्य पथकासोबत बैठक घेऊन राज्यातील कोरोना नियंत्रणाचाही आढावा घेतला. तसेच राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांविषयी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते.

22 हजार 251 प्रवाशांना सुखरुप घरी आणले

मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, वंदे भारत मिशन अंतर्गत आतापर्यंत जवळपास 145 विमानांच्या मदतीने 22 हजार 251 प्रवाशांना सुखरुप घरी आणण्यात आले आहे. यात मुंबईतील 8 हजार 70, इतर जिल्ह्यांमधील 7 हजार 686 आणि इतर राज्यातील 6 हजार 495 प्रवाशांचा समावेश आहे. 1 जुलै रोजी पुन्हा 26 विमानं मुंबईत येणार आहेत. या सर्व प्रवाशांना मुंबईत प्रवेश केल्यानंतर तात्काळ संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. इतर जिल्ह्यातील प्रवाशांना त्या त्या जिल्ह्याच्या मुख्यालयाकडे पाठवण्यात आले आहे. इतर राज्यातील प्रवाशांना त्यांच्या त्यांच्या राज्याकडून प्रवास परवाना मिळत नाही तोपर्यंत मुंबईतच ठेवण्यात येणार आहे. परवाना मिळाल्यावर त्यांना आपआपल्या घरी पाठवण्यात येईल.

गणेशाच्या मूर्तीची उंची महत्त्वाची नाही तर भक्ती महत्त्वाची

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आपण सारे येणारा गणेशोत्सव नियम पाळून, साधेपणाने साजरा करूयात. श्रीगणेशाच्या मूर्तीची उंची महत्त्वाची नाही तर भक्ती महत्त्वाची आहे. मूर्ती 4 फुटापर्यंत असावी व गणेशोत्सव काळात कुणीही कुठेही गर्दी करू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

या संकटापासून धर्म, परंपरा, संस्कृतीही सुटलेली नाही

उद्धव ठाकरे म्हणाले, ‘कोरोना’मुळे प्रत्येक क्षेत्रात संकट आले आहे. त्या संकटापासून धर्म, परंपरा, संस्कृतीही सुटलेली नाही. गर्दी टाळण्यासाठी देशभरातील सर्वच प्रार्थनास्थळे बंद ठेवली आहेत, हे क्लेशदायक असले तरी मनुष्यहानी टाळण्यासाठी याशिवाय दुसरा उपाय आज नाही. आता आपला सणांचा राजा गणेशोत्सव येत आहे. गणेशोत्सवाची एक उज्ज्वल परंपरा महाराष्ट्राने जपली आहे. श्री गजाजन घरोघर येतात. पण लोकमान्य टिळकांनी त्यास सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप देऊन सामाजिक, राजकीय चळवळ निर्माण केली. मोठी जनजागृती त्यातून आजही होत असते.”

“मुंबई-पुण्यातील भव्य गणेशमूर्ती, देखावे जगाचे आकर्षण ठरते. ते पाहण्यासाठी ११ दिवस प्रचंड गर्दी होत असते. निदान या वर्षी तरी आपल्याला हे सर्व टाळावे लागेल. मुंबईसह महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेश मंडळांशी माझी चर्चा झाली. शिस्तीचे व सामाजिक भान ठेवून उत्सव करावा यावर एकमत झाले,” असंही ते म्हणाले.

हेही वाचा :

रत्नागिरीत 6 गर्भवतींना कोरोना, 14 गरोदर मातांसह नवजात बालकांच्या चाचण्या

Pandharpur | आषाढी यात्रेच्या तोंडावर पंढरपुरात ‘कोरोना’ग्रस्त रुग्ण, प्रदक्षिणा मार्गावरील काही भाग सील

Mann Ki Baat | भारत मैत्री निभावतो, तसा वाकड्या नजरेने पाहणाऱ्या शेजाऱ्यांना उत्तरही देतो, मोदींचा थेट इशारा