मुख्यमंत्र्यांकडून इंस्टाग्रामवरील फोटोची दखल, विजयदुर्गच्या बुरुजाची पडझड रोखण्यासाठी पुरातत्त्व खात्याला निर्देश

| Updated on: Jul 18, 2020 | 11:24 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इंस्टाग्रामवर विजयदुर्ग या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलदुर्गाच्या एका बुरुजाची पडझड झाल्याचे लक्षात आले. त्यांनी या पोस्टची तत्काळ दखल घेतली (CM Uddhav Thackeray directs Archaeological Department to prevent collapse of Vijaydurg bastion).

मुख्यमंत्र्यांकडून इंस्टाग्रामवरील फोटोची दखल, विजयदुर्गच्या बुरुजाची पडझड रोखण्यासाठी पुरातत्त्व खात्याला निर्देश
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इंस्टाग्रामवर विजदुर्ग किल्ल्याच्या पडझडीबाबत एक फोटो बघितला. या फोटोची त्यांनी तातडीने दखल घेतील. त्यांनी भारतीय पुरातत्व खात्याला किल्ल्याच्या डागडुजी आणि देखभालीसाठी पावले उचलण्याबाबत पाठपुरावा करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिवांना दिल्या (CM Uddhav Thackeray directs Archaeological Department to prevent collapse of Vijaydurg bastion).

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रख्यात छायाचित्रकार आहेत. छायाचित्रकार असल्यामुळे इंस्टाग्राम या छायाचित्रांशी निगडीत समाज माध्यमावर ते सक्रीय आहेत. याशिवाय त्यांचे महाराष्ट्रातील गडकोट किल्ल्यांवर विशेष प्रेम आहे. गडकोट किल्ले आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळांच्या घडामोडींबाबत ते सजग असतात.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इंस्टाग्रामवर विजयदुर्ग या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलदुर्गाचा एका बुरुजाची पडझड झाल्याचे लक्षात आले. या पोस्टची तत्काळ दखल घेत, त्यांनी भारतीय पुरातत्त्व खात्याला याबाबत माहिती कळविण्याचे तसेच पडझड रोखण्यासाठी आणि या दुर्गाच्या देखभालीबाबतही केंद्राकडील या खात्याकडे पाठपुरावा करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव यांना त्यांनी सूचना दिल्या आहेत (CM Uddhav Thackeray directs Archaeological Department to prevent collapse of Vijaydurg bastion).

मुख्यमंत्र्यांच्या या तत्परतेमुळे विजयदुर्गच्या बुरुजाची पडझड रोखणे शक्य होणार. तसेच या जलदुर्गाच्या देखभालीचा मार्गही आणखी सूकर होणार आहे. गडकोट किल्ले हे महाराष्ट्राचे वैभव आहे. ते जतन करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी एक संवेदनशील दुर्गप्रेमी आणि शोधक छायाचित्रकाराच्या नजरेने पुढाकार घेतल्याने दुर्गप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.

हेही वाचा : पाच घुमट आणि 161 फूट उंचीचा प्रस्ताव, अयोध्येच्या भव्य राम मंदिराच्या भूमीपूजनाचं पंतप्रधानांना निमंत्रण