AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bharti Singh | कॉमेडीअन भारती आणि हर्ष लिंबाचीयालाही बाळाचे वेध, लवकरच ‘गुडन्यूज’ देणार!

कॉमेडी क्वीन भारती सिंह (Bharti Singh) तिच्या अनोख्या विनोदी शैलीने नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. तिच्या विनोदाच्या अचूक टायमिंगचे अनेक चाहते आहेत.

Bharti Singh | कॉमेडीअन भारती आणि हर्ष लिंबाचीयालाही बाळाचे वेध, लवकरच ‘गुडन्यूज’ देणार!
| Updated on: Oct 23, 2020 | 3:01 PM
Share

मुंबई : कॉमेडी क्वीन भारती सिंह (Bharti Singh) तिच्या अनोख्या विनोदी शैलीने नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. तिच्या विनोदाच्या अचूक टायमिंगचे अनेक चाहते आहेत. नेहमी स्वतःच्या विनोदी शैलीमुळे चर्चेत असणारी भारती सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. सध्या मनोरंजन विश्वात अनेक बड्या कलाकारांना बाळाची चाहूल लागली आहे. या सगळ्यांप्रमाणेच आता भारतीही आई होण्याचा विचार करते आहे. (Comedian Bharti Singh and Harsh limbachiyaa planning for baby in next year) यावेळी भारतीने चक्क तसे वचनच दिले आहे. येत्या नवीन वर्षात म्हणजेच 2021मध्ये मी ही माझ्या बाळाचे स्वागत करेन, असा मानस तिने बोलून दाखवला आहे. 2021मध्ये विराट-अनुष्का, करणवीर-टीजे, अनिता-रोहित आणि आणखी बऱ्याच कलाकारांच्या घरी चिमुकल्यांचे आगमन होणार आहे. ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या कार्यक्रमाच्या मंचावर भारतीने तिचा हा मानस बोलून दाखवला आहे.

View this post on Instagram

kuch pyrani tasveere ❤️i love you mr limbachhiya @haarshlimbachiyaa30 photography by @shivangi.kulkarni ??

A post shared by Bharti Singh (@bharti.laughterqueen) on

‘इंडियाज बेस्ट डान्सर’चे होस्ट ‘कपल’

सध्या भारती सिंह, तिचा नवरा हर्ष लिंबाचियासोबत (Harsh Limbachiyaa) सोनी टीव्हीच्या ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळते आहे. या कार्यक्रमाचा ‘रोमँटिक स्पेशल’ हा भाग नुकताच पार पडला. या भागात प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका आणि चित्रपट निर्मात्या फराह खान यांनी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थिती दर्शवली होती. याच विशेष भागात भारतीने तिची इच्छा व्यक्त केली आहे. तिच्या या वक्तव्यानंतर ती गर्भवती असल्याच्या चर्चांना उधाण आले होते,. मात्र, अद्याप तसे काहीच नसल्याचे भारतीने स्पष्ट केले आहे. (Comedian Bharti Singh and Harsh limbachiyaa planning for baby in next year)

भारती-हर्षाचा रोमँटिक डान्स

‘इंडियाज बेस्ट डान्सर’च्या या विशेष भागाला भारती आणि हर्षच्या रोमँटिक डान्सने चार चाँद लागले. या परफॉर्मन्सनंतर गीता कपूर यांनी भारतीला गंमतीत काही प्रश्न देखील विचारले. त्या म्हणाल्या की, हर्षला तुझ्यासोबत रोमँटिकली बोलताना आम्ही पाहिले आहे, पण तुला हर्ष सोबत तसे बोलताना कधीही पाहिले नाही. हर्षसाठी काहीतरी रोमँटिक करावे, असे तुला वाटत नाही का? यावर उत्तर देताना भारती म्हणाली की, ‘शो-ऑफ करण्यावर माझा विश्वास नाही. मी माझ्या दिवसाची सुरुवात हर्षपासूनच करते. हर्षशिवाय मी माझ्या जीवनाचा विचारही करू शकत नाही.’ ‘हर्षच्या आईने त्याला माझ्या हाती सोपवले आहे. त्याची सगळी जबाबदारी माझ्याकडे आहे. मी त्याची फक्त पत्नीच नाहीतर आई बनण्याचा प्रयत्नदेखील करते. हर्ष सकाळी उठण्यापूर्वी त्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी जागच्या जागी आहेत ना याची मी खात्री करून घेते. त्याला कुठलाही त्रास होणार नाही याचीही नेहमी काळजी घेत असल्याचे भारती सिंह म्हणाली.

संबंधित बातम्या : 

Laxmmi Bomb | ‘लक्ष्मी बॉम्ब’ पुन्हा वादात, चित्रपटाचे नाव बदलण्याच्या मागणीला जोर!

‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ पंचवीशीत; 18 देशांत पुन्हा प्रदर्शित होणार

रोहनप्रीतच्या प्रपोजवर नेहाचा रोमँटिक होकार, सोशल मीडियावर PHOTOS ची चर्चा

(Comedian Bharti Singh and Harsh limbachiyaa planning for baby in next year)

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.