‘विजयवर्गीयांच्या गालासारखे रस्ते, हेमा मालिनींच्या गालासारखे करु!’

| Updated on: Oct 16, 2019 | 11:30 AM

कैलाश विजयवर्गीय यांच्या गालासारखे रस्त्यावर खड्डे पडले आहेत, 15 ते 20 दिवसात हेमामालिनींच्या गालासारखे चकाचक होतील, असं काँग्रेस मंत्री पीसी शर्मा म्हणाले.

विजयवर्गीयांच्या गालासारखे रस्ते, हेमा मालिनींच्या गालासारखे करु!
Follow us on

भोपाळ : मध्य प्रदेशातील काँग्रेसचे मंत्री पी सी शर्मा यांची रस्त्याच्या स्थितीवर टीका करताना जीभ घसरली. कैलास विजयवर्गीयांच्या गालासारखे रस्त्यावर खड्डे पडले आहेत, 15 ते 20 दिवसात हेमामालिनींच्या गालासारखे चकाचक होतील, असं शर्मा (PC Sharma compares Roads) म्हणाले.

पी सी शर्मा यांनी टीका करताना भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय आणि भाजप खासदार हेमा मालिनी या दोघांचा संदर्भ घेतला. ‘वॉशिंग्टन आणि न्यूयॉर्कमध्ये बांधलेले रस्ते कसे होते? इथे जोरदार पाऊस पडला आणि पाण्यामुळे रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले. अगदी कैलास विजयवर्गीय यांच्या गालासारखे. आता 15-20 दिवसांत हेमा मालिनींच्या गालासारखे चकाचक रस्ते होतील.’ असं पी सी शर्मा म्हणाले आहेत. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेचा भडिमार सुरु झाला आहे.

पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांची पाहणी करण्यासाठी पीसी शर्मा गेले होते. त्यावेळी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना नाव न घेता त्यांनी टोला (PC Sharma compares Roads) लगावला.

24 ऑक्टोबर 2017 रोजी शिवराजसिंह चौहान वॉशिंग्टन डीसीला गेले होते. ‘वॉशिंग्टन विमानतळावर उतरलो तेव्हा तिथले रस्ते पाहिल्यानंतर मला मध्य प्रदेशातील रस्ते अधिक चांगले आहेत, असं वाटलं’ असं चौहान म्हणाले होते. या वक्तव्यावर टीका करण्याच्या नादात शर्मांनी पातळी सोडली.

स्मृतीजी, संसदेत येण्याच्या इच्छेमुळे हिंदीत भाषण करतो : खडसे

‘ड्रीमगर्ल’ हेमा मालिनी यांच्या गालांची तुलना गुळगुळीत रस्त्यांसोबत होण्याचीही पहिलीच वेळ नाही. हेमा मालिनींच्या गालासारखे रस्ते व्हावेत, अशी इच्छा बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनीही व्यक्त केली होती.