पोलिसावर हात उगारणे अंगलट, महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा

| Updated on: Oct 15, 2020 | 5:12 PM

काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी 24 मार्च 2012 रोजी अमरावतीत पोलिस कॉन्स्टेबलशी हुज्जत घालत हात उगारण्याचा प्रयत्न केला होता.

पोलिसावर हात उगारणे अंगलट, महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा
Yashomati Thakur
Follow us on

अमरावती : पोलीस कॉन्स्टेबलवर हात उगारणे काँग्रेसच्या फायरब्रँड नेत्या यशोमती ठाकूर यांना भोवले आहे. ठाकरे सरकारमध्ये महिला-बालकल्याण मंत्रिपदाची धुरा सांभाळणाऱ्या यशोमती ठाकूर यांना तीन महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आठ वर्ष जुन्या प्रकरणात ठाकूर यांना शिक्षा झाली आहे. (Congress Minister Yashomati Thakur sentenced three months for beating Police)

यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत अंबादेवी मंदिराजवळ पोलिसाशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना 24 मार्च 2012 रोजी घडली होती. पोलीस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांच्याशी हुज्जत आणि मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा आणणे या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

अमरावती जिल्हा न्यायालयात आरोप सिद्ध झाल्याने यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा आणि 15 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. त्यांचा कार चालक आणि सोबतचे दोन कार्यकर्ते देखील दोषी आढळले आहेत. फितुर होऊन साक्ष देणारा एक पोलिसही शिक्षेस पात्र ठरला आहे.

संबंधित बातम्या : 

महिलांकरिता विशेष बससेवा उपलब्ध करावी, यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने मुंबईची रणरागिणी झाली टॅक्सीचालक, यशोमती ठाकूरांच्या कौतुकाने स्मिता झगडे गहिवरल्या

(Congress Minister Yashomati Thakur sentenced three months for beating Police)