AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने मुंबईची रणरागिणी झाली टॅक्सीचालक, यशोमती ठाकूरांच्या कौतुकाने स्मिता झगडे गहिवरल्या

नोकरीच्या मागे न लागता, ड्रायव्हिंग ही आपली कलाच आपल्याला स्वयंपूर्ण करेल, असा विश्वास बाळगत स्मिता झगडे यांनी टॅक्सी चालवायला सुरुवात केली.

लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने मुंबईची रणरागिणी झाली टॅक्सीचालक, यशोमती ठाकूरांच्या कौतुकाने स्मिता झगडे गहिवरल्या
| Updated on: Sep 06, 2020 | 7:30 PM
Share

मुंबई : ड्रायव्हिंग स्कूलमध्ये चारचाकी चालवण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या स्मिता झगडे यांनी लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्यावर मुंबईत टॅक्सी चालवण्याचा निर्णय घेतला. स्मिता यांची जिद्द पाहून महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी चक्क घरी बोलवून त्यांना कौतुकाची थाप दिली. या सन्मानाने स्मिता अक्षरशः भारावून गेल्या. (Mumbai’s Lady Taxi Driver Smita Jhagade felicited by Minister Yashomati Thakur)

लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याने हताश न होता टॅक्सी चालवण्याचा निर्णय घेणाऱ्या स्मिता झगडे यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. टॅक्सीच्या ड्रायव्हिंग सीटवर असलेल्या स्मिता केवळ गाडीचेच नव्हे, तर महिला सक्षमीकरणाचे सारथ्य करत असल्याची भावना यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली. आपल्या निवासस्थानी बोलवून ठाकूर यांनी स्मिता झगडे यांचा सन्मान केला.

मुंबईत राहणाऱ्या स्मिता झगडे गेली सात वर्ष ड्रायव्हिंग स्कूलमध्ये चारचाकी चालवण्याचे प्रशिक्षण देत होत्या. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये त्यांचा रोजगार बुडाला. तीन महिने कुठलीही कमाई नाही, एकल पालकत्वाची जबाबदारी अशा सगळ्या परिस्थितीत स्मिता यांना आपल्या मुलीसाठी, संसारासाठी काहीतरी करणं भाग होतं.

नोकरीच्या मागे न लागता, ड्रायव्हिंग ही आपली कलाच आपल्याला स्वयंपूर्ण करेल, असा विश्वास बाळगत त्यांनी टॅक्सी चालवायला सुरुवात केली. याआधी इतरांना गाडी शिकवणं आणि आता स्वत: मुंबईच्या रस्त्यावर टॅक्सी चालवणं हा प्रवास सोपा नव्हता.

हेही वाचा : आजोबा शरद पवारांचे नातवाला ड्राईव्हिंगचे धडे, आई सुप्रिया सुळेंचा आनंद गगनात मावेना

अनेकांनी त्यांना हे बाईचं काम नाही, यात पडू नये असे नसते सल्ले दिले. मात्र पहिल्याच दिवशी झालेल्या तब्बल 1500 रुपयांच्या कमाईने त्यांचा आत्मविश्वास वाढला. शहर पूर्वपदावर आल्यावर सगळं सुरळीत होईल, अशी आशा त्यांना वाटते. (Mumbai’s Lady Taxi Driver Smita Jhagade felicited by Minister Yashomati Thakur)

यशोमती ठाकूर यांनी सत्कार केल्याने स्मिता झगडे हरखून गेल्या. “ठाकूर मॅडम यांनी काही झालं, तरी मागे फिरु नकोस, मी सदैव तुझ्यासोबत आहे असं सांगत मला आशीर्वाद दिला आणि मी योग्य निर्णय घेतला, याची आज खात्री पटली” अशा भावना स्मिता यांनी व्यक्त केल्या.

“आणखी एक टॅक्सी घेऊन त्याद्वारे एका महिलेलाच रोजगार देण्याची स्मिता यांची इच्छा आहे. वाहनचालक म्हणून काम करत आपण संसाराला नक्कीच हातभार लावू शकतो” असा संदेश त्या महिलांना देतात.

संबंधित बातम्या :

सलोनी, ‘जिंकलंस लेकी’, मंत्री यशोमती ठाकूर यांचा फोन, बिनधास्त सलोनी भारावली

(Mumbai’s Lady Taxi Driver Smita Jhagade felicited by Minister Yashomati Thakur)

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.