Nagpur Corona : नागपूरकरांसाठी गूड न्यूज, कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

| Updated on: Oct 18, 2020 | 8:17 AM

नागपूरमध्ये कोरोनाची दहशत हळूहळू कमी होत असल्याचे मागील काही आठवड्याच्या आकडेवारी वरून दिसून येत आहे (Corona patient decrease in Nagpur).

Nagpur Corona : नागपूरकरांसाठी गूड न्यूज, कोरोना रुग्णांच्या संख्येत घट
Follow us on

नागपूर : नागपूरमध्ये कोरोनाची दहशत हळूहळू कमी होत असल्याचे मागील काही आठवड्याच्या आकडेवारी वरून दिसून येत आहे (Corona patient decrease in Nagpur). सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात रुग्णांची संख्या 12403 आणि मृतांची संख्या 358 वर गेली होती. तर ऑक्टोबर महिन्याच्या या आठवड्यात रुग्णांची संख्या 3670 तर मृतांची संख्या 145 वर आली आहे (Corona patient decrease in Nagpur).

गेल्या तीन आठवड्यात 8732 रुग्ण आणि 213 लोकांच्या मृत्यूची घट झाली. आरोग्य यंत्रणेसाठी ही समाधानकारक बाब आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुतीला रुग्ण बरे होण्याचा दर 41 टक्क्यांवर असताना आता तो 88 टक्क्यांवर पोहोचला आहे. रुग्णसंख्या दुपटीने वाढण्याचा दरही 106 दिवसांवर गेला आहे.

भारतात अडीच महिन्यांनंतर रुग्ण वाढण्याची साखळी मोडली

भारतात कोरोनाचा (Coronavirus) धोका थांबवण्यासाठी मार्च महिन्यापासून लॉकडाऊन (Lockdown) सुरू आहे पण तरीदेखील मोठ्या संख्येनं रुग्ण वाढताना दिसले. पण आता मात्र भारतीयांसाठी (India) मोठी आनंदाची बातमी (Good News) समोर येत आहे. गेल्या अडीच महिन्यात (74 दिवस) जगातील सगळ्यात जास्त कोरोना रुग्ण समोर येण्याचा रेकॉर्ड अखेर थांबला आहे. 17 ऑक्टोबरपासून याला ब्रेक लागला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

जागतिक आरोग्य संस्था (WHO) ने दिलेल्या माहितीनुसार, 17 ऑक्टोबरला अमेरिकेमध्ये (America) 24 तासांमध्ये 63,044 नवी प्रकरणं समोर आली आहे. हा आकडा जगातील आतापर्यंतचा सगळ्यात मोठा आकडा आहे. 4 ऑगस्टपासून संपूर्ण जगामध्ये सर्वाधिक नवीन कोरोना प्रकरणं भारतातून समोर येत होती. 17 ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 24 तासांत 62,212 नवीन प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. भारत कोरोनाच्या संक्रमणात जगातील दुसरा देश आहे. अमेरिकेत आतापर्यंत नोंदवलेल्या एकूण प्रकरणांची संख्या 78,96,895 इतकी आहे.

संबंधित बातम्या :

भारतात कोरोना लस कधी येणार? जगातील सर्वात मोठ्या कोरोना लस उत्पादन कंपनीकडून माहिती

Corona Vaccine | नागरिकांपर्यंत वेगाने कोरोना लस पोहचवण्यासाठी व्यवस्था करा : पंतप्रधान मोदी