देशभरात 1992 रुग्णांची कोरोनावर मात, बाधितांची संख्या 14,378 वर, 29.8 टक्के रुग्ण तब्लिगींशी संबंधित

| Updated on: Apr 18, 2020 | 6:42 PM

देशात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 14,378 वर पोहोचली आहे. यापैकी 29.8 टक्के रुग्ण तब्लिगींशी संबंधित आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली (Corona patient in India).

देशभरात 1992 रुग्णांची कोरोनावर मात, बाधितांची संख्या 14,378 वर, 29.8 टक्के रुग्ण तब्लिगींशी संबंधित
Follow us on

नवी दिल्ली : देशभरात आतापर्यंत 1,992 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे (Corona patient in India). कोरोना विरोधात लढण्यासाठी सरकार आणि प्रशासन सर्वोतोपरी मेहनत घेत आहे. देशात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 14,378 वर पोहोचली आहे. यापैकी 29.8 टक्के रुग्ण तब्लिगींशी संबंधित आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिली. केंद्रीय आरोग्य आणि गृह मंत्रालयाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते (Corona patient in India).

देशभरातील 14,378 रुग्णांपैकी 4,291 रुग्णांचा संबंध तब्लिगी जमातशी आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 29.8 टक्के रुग्ण हे तब्लिगी जमातशी संबंधित आहेत, असं लव अग्रवाल यांनी सांगितलं. त्याचबरोबर गेल्या 14 दिवसात देशातील 45 जिल्ह्यांमध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही, असंदेखील लव अग्रवाल यांनी सांगितलं.

देशभरात 17 एप्रिल रोजी 991 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 14,378 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे गेल्या 24 तासात 43 रुग्णांचा मृत्यू झाला. तर देशभरात आतापर्यंत 480 लोकांचा बळी गेला आहे. देशातील कोरोनाचा मृत्यूदर सध्या 3.3 टक्के आहे, अशी माहिती लव अग्रवाल यांनी दिली.

कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांमधील 14.4 टक्के रुग्ण हे 0 ते 45 वयोगटातील आहेत. तर 10.3 टक्के रुग्ण हे 45 ते 60 वयोगटातील आहेत. याशिवाय 33.1 टक्के रुग्ण हे 60 ते 75 तर 42.2 टक्के रुग्ण हे 75 वर्षांपेक्षा जास्त वयाची आहेत, असं अग्रवाल म्हणाले.

दरम्यान, गृह मंत्रालयाच्या सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी लॉकडाऊनमुळे भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांबाबत एक महत्त्वपूर्ण माहिती दिली. लॉकडाऊनमुळे जे विदेशी नागरिक भारतात अडकले आहेत आणि त्यांचा व्हिजा संपला असेल तर 3 पेर्यंत त्यांच्या व्हिजाचा कालावधी निशुल्कपणे वाढवण्यात आला आहे, असं पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

धाकधूक वाढली, मुंबईतील सात अतिगंभीर वार्डमध्ये 110 पेक्षाही जास्त रुग्ण