हिंगोलीच्या पॅटर्नमुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ, प्रशासनाचं मात्र दुर्लक्षच

| Updated on: Oct 08, 2020 | 10:45 AM

तपासण्या न करता कमी रुग्णसंख्या दाखवण्याचा हिंगोलीचा हा पॅटर्न नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारा असाच म्हणावा लागेल.

हिंगोलीच्या पॅटर्नमुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ, प्रशासनाचं मात्र दुर्लक्षच
प्रातिनिधिक छायाचित्रं
Follow us on

हिंगोली : राज्यात कोरोनाचा धोका सर्वाधिक आहे. अशात अनेक जिल्ह्यांमध्ये संसर्गाचा शिरकाव रोखण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न केले जात आहे. पण हिंगोली जिल्ह्यातून मात्र एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत हिंगोली जिल्ह्याची रुग्णसंख्या कमी असल्याने जिल्हा प्रशासन स्वतःची पाठ थापटून घेत आहे. पण तपासण्या न करता कमी रुग्णसंख्या दाखवण्याचा हिंगोलीचा हा पॅटर्न नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारा असाच म्हणावा लागेल. खरंतर, रुग्ण संख्या कमी असतानाही रुग्णांना उपचार मिळत नसल्याची ओरड नागरिकांकडून होऊ लागली आहे. (corona risk is increasing in hingoli district because of administration ignorance)

मुंबई-पुणे आणि इतरत्र जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवतच गेला. आम्ही जिल्ह्यात कम्युनिटी स्प्रेड होऊ दिलं नाही. यंत्रणेच्या माध्यमातून हवी ती काळजी घेतली. सगळं काही योग्य सुरू आहे. तर जिल्ह्यातील प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन तपासणी केल्याचा दावा जिल्हाधिकाऱ्यांनी केला आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात 2 हजार 774 कोरोनाचे रुग्ण आढळले असून 2 हजार 511 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत तब्बल 42 जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर मंगळवारपर्यंत 211 रुगणांवर उपचार सुरू होते. त्यातील 32 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुगणालय प्रशासनाने दिली आहे. हे सगळं सुखकर वाटत असलं तरी मंगळवारी हिंगोली शहर परिसरात घेण्यात आलेल्या 56 चाचण्यांपैकी 8 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. म्हणजेच 6 लोकांमध्ये एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळला असतांना जिल्हाभरात कोरोनाची कुठे ही तपासणी कॅम्प आढळत नाहीत.

हिंगोलीच्या तोफखाण्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले. पण असं असताना प्रशासनाच्यावतीने कुठेही जनजागृती होताना दिसत नाही. नागरिक रस्त्यांवर मास्क न वापरता फिरत आहेत. व्यापारी कोणतेच नियम पाळत नाहीत. महत्त्वाच्या ठिकाणी गर्दी बघायला मिळते. यावर मात्र प्रशासनाचं लक्ष नाही. (corona risk is increasing in hingoli district because of administration ignorance)

ऑक्सिजन, ICU बेडची कमतरता नसल्याचा रुगणालय दावा करतं आहे, तर रेमडीसीवीरच्या इंजेक्शनच्या तुटवडा असल्याचं खुद्द जिल्हा चिकित्सकांनी मान्य केलं आहे. पॉझिटिव्ह रुग्णांचा रुगणालयाबाहेर मुक्त संचार सुरू आहे. शिवाय, मृत झालेल्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार नातेवाईकांनाच करावे लागत आहेत. सगळ्याच बाबतीत तुडवडा असतानाही सगळं सुरळीत सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. पण यातून सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे प्रशासनाने आता तरी गंभीर भूमिका घेऊन कोरोना हद्दपार करण्यासाठी जोर लावण्याची गरज आहे.

इतर बातम्या –

कमी उत्पन्न असणाऱ्यांसाठी Good News, रोज फक्त 28 रुपयांच्या खर्चावर मिळवा बक्कळ पैसे

पगार मिळवण्यासाठी शिक्षकाचा अजब फंडा, अशा ठिकाणी संसार थाटला की सगळेच हादरले

(corona risk is increasing in hingoli district because of administration ignorance)