परदेशातून आलेल्यांना सरकारी जागेत क्वारंटाईन करा, कोरोना रोखण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याचं पत्र

आपल्याला हे सर्व रोखायचं असेल, तर परदेशातून आलेल्या लोकांना सरकारी क्वारंटाईन करा, अशी मागणी वाटेगावकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केली (Corona Virus Social Activist letter) आहे.

परदेशातून आलेल्यांना सरकारी जागेत क्वारंटाईन करा, कोरोना रोखण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याचं  पत्र
| Updated on: Mar 28, 2020 | 6:03 PM

मुंबई : राज्यात कोरोनाने गुणाकार करण्यास सुरुवात केली (Corona Virus Social Activist letter) आहे. त्या पार्श्वभूमीवर “जे परदेशातून आले आहेत त्या सर्वांना होम क्वारंटाईन न करता सरकारी जागेत क्वारंटाईन करावं,” अशी मागणी करणारे पत्र सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं आहे.

प्रवीण वाटेगावकर यांच्या पत्रानुसार, “जे परदेशातून आले आहेत त्या सर्वांना होम क्वारंटाईन न करता त्यांना सरकारी जागेत क्वारंटाईन करावं. कारण परदेशातून आलेल्या अनेक लोक ही कोरोनाबाधित आहेत. त्यांना होम क्वारंटाईनसाठी सांगितलं जातं. मात्र तरीही काही लोक हे सर्व ठिकाणी फिरत (Corona Virus Social Activist letter) असतात. तसेच अनेक लोकही त्यांच्या भेटीला येत असतात. त्यामुळे या लोकांना सरकारी जागेत क्वारंटाईन करावं,” अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

नुकतंच सांगलीत याबाबतचे मोठे उदाहरण पाहायला मिळत आहे. “सांगलीत चार जण दुबईहून आले. ते अनेकांना भेटले. तसेच अनेक जणही त्यांना भेटायलाही आले. त्यामुळे आता सांगलीतील कोरोनाबाधितांची संख्या 24 झाली आहे,” असेही वाटेगावकर यांनी पत्रात म्हटलं आहे.

जर आपल्याला हे सर्व रोखायचं असेल, तर परदेशातून आलेल्या लोकांना सरकारी क्वारंटाईन करा, अशी मागणी वाटेगावकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केली आहे.

महाराष्ट्रात कुठे किती कोरोनाबाधित रुग्ण?

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

मुंबई – 65 (4 मृत्यू)
सांगली – 24
पुणे – 20 (डिस्चार्ज 6)
पिंपरी चिंचवड – 13
नागपूर 12
कल्याण – 6
नवी मुंबई – 6
ठाणे – 5
यवतमाळ – 4
अहमदनगर – 3
सातारा – 2
पनवेल – 2
कोल्हापूर – 1
गोंदिया – 1
उल्हासनगर – 1
वसई विरार – 1
औरंगाबाद – 1
सिंधुदुर्ग – 1
पालघर – 1
रत्नागिरी – 1
गुजरात – 1
एकूण 171 – मुंबईत 4 मृत्यू = 167