AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Virus | सुट्टी, कार्यालयीन कामकाजाबाबतचे केंद्राचे ‘ते’ परिपत्रक खोटे

नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता राज्यशासन वेळोवेळी देत असलेल्या सूचनाच ग्राह्य मानाव्यात, असे आवाहनही (central government Holiday Notification fake) करण्यात आले आहे.

Corona Virus | सुट्टी, कार्यालयीन कामकाजाबाबतचे केंद्राचे 'ते' परिपत्रक खोटे
| Updated on: Mar 13, 2020 | 10:59 PM
Share

मुंबई : कोरोना विषाणूला अटकाव करण्याच्या दृष्टीने सुट्टी आणि कार्यालयीन कामकाजाबाबत समाजमाध्यमांवर एक परिपत्रक प्रसारित झाले (central government Holiday Notification fake)  होते. मात्र हे परिपत्रक खोटे असून नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून (central government Holiday Notification fake)  सुट्टी व कार्यालयीन कामकाजाबाबतचे एक परिपत्रक व्हायरल होत होते. या परिपत्रकात दंडाच्या तरतुदीबाबत खोटी माहिती पसरविण्यात येत आहे. मात्र त्यात कोणतेही तथ्य नाही. हे परिपत्रक खोटे आहे. अशा कुठल्याही सूचना केंद्र शासनाने दिलेल्या नाहीत.

यासंदर्भात शासनाने गंभीर दखल घेतली असून, याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्याबाबत तपास सुरू आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता राज्यशासन वेळोवेळी देत असलेल्या सूचनाच ग्राह्य मानाव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.

कोरोनाबाधितांचा आकडा वाढला

दरम्यान राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. अहमदनगरमधील एका रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 18 वर पोहोचली आहे.

कोरोना व्हायरस संदर्भात शासनातर्फे अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहे. यानुसार, “पुढील आदेशापर्यंत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहरातील जिम, चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, नाट्यगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळ अधिवेशनात याबाबतची माहिती दिली.

यात दहावी आणि बारावी परीक्षेच्या व्यतिरिक्त पिंपरी-चिंचवड आणि पुणे या ठिकाणच्या शाळा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईतील शाळा मात्र नियमित सुरु राहतील, असेही मुख्यमंत्र्यांनी (central government Holiday Notification fake)  सांगितले.

संबंधित बातम्या  

पुणे, मुंबईनंतर ठाण्यातही कोरोनाचा शिरकाव, राज्यातील बाधितांची संख्या 14 वर

Corona cases in India | देशात आतापर्यंत 73 जणांना लागण, कोरोनाबाधितांमध्ये महाराष्ट्राचा दुसरा नंबर

Corona | नागपुरातही कोरोनाबाधित रुग्ण आढळला, राज्यातील संख्या 11 वर

घरी ये राजा, तुला आयुष्यभर खाऊ घालेन, ‘कोरोना’च्या भीतीने पुण्यातील लेकाला माऊलीची आर्त हाक

17 दिवसाच्या चिमुरडीने कोरोनाला हरवलं, उपचाराशिवाय बरी

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...