इटलीत हनिमून, पतीला कोरोनाची लागण झाल्याचं समजताच पत्नीचा पोबारा

आग्र्यात एका गुगल कर्मचाऱ्याच्या पत्नीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं उघड झालं आहे. ही महिला नुकतीच इटलीला हनिमुनला गेली होती.

इटलीत हनिमून, पतीला कोरोनाची लागण झाल्याचं समजताच पत्नीचा पोबारा
Nupur Chilkulwar

|

Mar 14, 2020 | 2:53 PM

लखनऊ : आग्र्यात एका गुगल कर्मचाऱ्याच्या (Google Employee) पत्नीला कोरोना (Couple Found Corona Positive) विषाणूची लागण झाल्याचं उघड झालं आहे. ही महिला नुकतीच इटलीला हनिमुनला गेली होती. हे दाम्पत्य नुकतंच इटलीवरुन बंगळुरुला आलं होतं. तिथे तिच्या पतीला कोरोना विषाणूची लागण (Couple Found Corona Positive) झाल्याचं कळालं. तेव्हापासून ही महिला फरार होती.

पतीला कोरोना झाल्याचं कळताच महिलेने 8 मार्चला (Corona Virus) बंगळुरुवरुन दिल्लीची फ्लाईट घेतली. दिल्लीवरुन ट्रेनने ती आग्र्याला तिच्या माहेरी गेली. तिच्या माहेरी 8 जण राहतात. सध्या तिच्या कुटुंबातील सर्वांना आयसोलेशन सेंटरमध्ये पाठवण्यात आलं आहे, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा : कोरोनाचा प्रेक्षकांना फायदा, प्रिमियम पॉर्न व्हिडीओ फ्री

पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी महिलेच्या माहेरी जाऊन चौकशी केली. तेव्हा मुलगी बंगळुरुसाठी रवाना झाल्याची खोटी माहिती महिलेच्या वडिलांनी पोलिसांना दिली. मात्र, ही महिला बंगळुरुला गेलीच नव्हती. ती आग्र्यातच तिच्या वडिलांच्या घरी होती. या महिलेचे वडील हे रेल्वेत इंजिनिअर असल्याची माहिती आहे.

“या प्रकरणी डीएम यांच्या स्वाक्षरीनंतर आम्ही (Couple Found Corona Positive) महिलेच्या वडिलांच्या घरापर्यंत पोहोचलो. त्यानंतर महिलेच्या कुटुंबातील सर्व नऊ सदस्यांची स्क्रिनिंग करण्यासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं. सध्या पीडित महिलेला एसएन मेडिकल कॉलेजच्या आयसोलेशन विभागात पाठवण्यात आलं आहे”, अशी माहिती आग्र्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकेश कुमार वत्स यांनी दिली.

जगभरात कोरोनामुळे 5 हजार जणांचा मृत्यू

जगभरात आतापर्यंत 1,45,000 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. तर जवळपास 5 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

भारतातही कोरोनाची दहशत

भारतात आतापर्यंत 82 नागरिकांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दिल्लीच्या आरएमएल रुग्णालयात 68 वर्षांच्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या महिलेच्या मुलगा स्वित्झर्लंड आणि इटलीचा दौरा करुन आला होता. सध्या महिलेच्या (Couple Found Corona Positive) मुलाचा उपचार सुरु आहे.

संबंधित बातम्या :

Corona | मुंबई, पुणे, नागपुरात जिम, थिएटर आणि मॉल बंद

CoronaVirus : रुग्णांचा कोरोनाशी यशस्वी लढा, भारतात उपचारानंतर 11 जण ठणठणीत बरे

अमेरिकेत कोरोनाची दहशत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा

कोरोनाची धास्ती, कोल्हापुरात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें