मुंबईतील भांडुपमध्ये युवा क्रिकेटरची निर्घृण हत्या

राकेश पवार हा युवा क्रिकेटपटू होता. राकेश हा लहान मुलांना क्रिकेटचं प्रशिक्षण देत असे.

मुंबईतील भांडुपमध्ये युवा क्रिकेटरची निर्घृण हत्या
| Edited By: | Updated on: Jun 07, 2019 | 8:29 AM

मुंबई : भांडुप येथे राकेश पवार नावाच्या युवा क्रिकेटरची (Cricket) हत्या करण्यात आली. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात लोकांनी धारदार शस्त्रांनी राकेशवर हल्ला केला. या भीषण हल्ल्यात राकेशचा मृत्यू झाला. राकेशवर जेव्हा हल्ला झाला, त्यावेळी राकेश महावीर पेट्रोल पंपवर पेट्रोल भरायला गेला होता.

राकेश पवार हा युवा क्रिकेटपटू होता. राकेश हा लहान मुलांना क्रिकेटचं प्रशिक्षण देत असे.

राकेशवर जेव्हा हल्ला करण्यात आला, त्यावेळी त्याच्यासोबत एक मुलगी होती. त्या मुलीसोबत राकेशचे प्रेमसंबंध होते, अशी माहिती मिळते आहे. राकेशचं लग्न झालं होतं आणि त्याला दोन मुलंही आहेत.

राकेशची हत्या प्रेमसंबंधातून झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे.